छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारचा पराभव झाल्यानंतर या राज्यात भाजपचे बहुमताने सरकार आले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी विशेष बदल होत आहे. आता या राज्यात खिश्चन मिशनऱ्यांनी खोटी आमिषे दाखवून धर्मांतरीत केलेली १०१ कुटुंबे हिंदू धर्म स्वीकारुन घरवापसी (Ghar wapasi) करणार आहेत.
सर्वांचे पाय धुवून हिंदू धर्मात परत आणले जाणार
छत्तीसगडमध्ये धर्मांतर ही मोठी समस्या आहे. यामध्येही सर्वाधिक ख्रिश्चन हे धर्मांतरीत केलेले आहेत. परंतु आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली कुटुंबे घरवापसी (Ghar wapasi) करू लागले आहेत. अशी माहिती हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या एका हिंदू संघटना धर्म सेनेने दिली आहे. ही संघटना प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये धर्मांतरित केलेल्या हिंदू कुटुंबियांची घरवापसी (Ghar wapasi) करत असते. आता १०१ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात येणार आहेत. वैदिक विधींनुसार पूजा आणि हवन केल्यानंतर सर्वांचे पाय धुवून हिंदू धर्मात परत आणले जाणार आहे.
इस्लाम आणि ख्रिश्चन पंथीयांकडून धर्मांतर सुरू
धर्म सेनेने म्हटले आहे की, छत्तीसगड हे आदिवासी बहुल राज्य आहे. इथल्या मागासलेल्या भागात पूर्वीपासूनच इस्लाम आणि ख्रिश्चन पंथीयांकडून धर्मांतर सुरू आहे, गेल्या काही वर्षांत धर्मांतराचा वेग झपाट्याने वाढला आहे, आता शहरांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने झाला आहे. हे थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धर्मांतराच्या घटनांना आळा घातला यावा, यासाठी लोकांना जागरूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ज्यांनी खोट्या प्रलोभनामुळे इतर पंथ स्वीकारले होते, त्यांची घरवापसी (Ghar wapasi) करण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सध्या राज्यात १७ हिंदू संघटना आहेत, ज्या धर्मांतरापासून लोकांना वाचवण्यासाठी सातत्याने जनजागृती करत आहेत. या सर्व संस्थांशी संबंधित लोकांनाही या घरवापसी (Ghar wapasi) कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरबामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक सनातन धर्माकडे परतण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.
Join Our WhatsApp Community