Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, ‘ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही हे परमेश्वराचे उपकार’

287
Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, नागपूर आणि महाराष्ट्रातील नेत्यांना धक्का
Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, नागपूर आणि महाराष्ट्रातील नेत्यांना धक्का
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. राजकीय, सामाजिक किंवा विकासकामांचा विषय असो, गडकरी सडेतोड भाष्य करत असतात. सध्या राज्यात आरक्षणाचा विषय जोरदार चर्चेला आला आहे. अशा वेळी नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी? 

परमेश्वराचे उपकार आहे, की, ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही. म्हणून ब्राह्मण समाज व्यवसाय करतोय. वडापावाचे दुकान टाकतात, सलून काढतात. तसेच पुण्यातील प्रत्येक घरातील मुलगा अमेरिकेत आहे. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर कामे होतात, अडचणी येतच असतात पण त्यातून मार्ग काढला पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. आपण दहावीत असताना आणीबाणी लागली होती, आपण त्या आंदोलनात होतो. त्यातच वर्ष वाया गेले. पुढे दहावीत ५२ टक्के मार्क मिळाले. आमच्या घरात सगळे जण शिकलेले आहेत. घराची मंडळी मला म्हणायचे राजकारणाचा नाद सोड, पण मी नोकरी मागणारा नव्हे तर देणार होईल यावर माझा विश्वास होता, असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

विचारशून्यात ही मोठी समस्या 

सध्या देशाचा विचार केला तर विचारशून्यात ही मोठी समस्या बनली आहे.  आज नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, यू आर नोन अपॉर्च्यूनिस्ट हे राजकारणातील सूत्र आहे. कोण कोणत्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात आणि कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही, अशी खंत नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.