भारतीय किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात ड्रोनने (Drone Attack ) एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. हे जहाज भारताकडे जात होते. हा हल्ला येमेनच्या हुथी बंडखोरांनी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर व्यापारी जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हल्ला झालेल्या जहाजाला अत्यंत सावधगिरीने पुढील प्रवास पूर्ण करण्याच्या सूचना भारतीय महासागर ट्रिगर्स फायर ऑन बोर्ड (indian ocean triggers fire on board ) देण्यात आल्या आहेत.
भारतात येणाऱ्या या जहाजावर ड्रोन हल्ला केल्यानंतर या जहाजाला आग लागली. यापूर्वी इस्रायलवरील हल्ल्याला विरोध करण्याऱ्या यमन हुथींनी भारतात येणाऱ्या जहाजाचे अपहरण केले होते तसेच लाल समुद्रात क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्लाही केला होता. यामुळे अनेक जहाजांचे नुकसान झाले होते. हौथींना इराणचा उघड पाठिंबा आहे आणि ते हमासच्या समर्थनार्थ वारंवार क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आले आहेत. यामुळे जगातील सर्वात व्यस्त व्यापार मार्गांपैकी एक असलेला सागरी मार्ग आता संकटात सापडला आहे. म्हणूनच अनेक कंपन्या आता आफ्रिकेच्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत. त्यासाठी खूप खर्च येतो.
ब्रिटनच्या मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स ऑर्गनायझेनने यापूर्वी हल्ल्याची माहिती दिली होती. या हल्ल्यात कर्मचाऱ्यांपैकी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या हल्लाबाबत अनेक अहवालांमध्ये माहिती देण्यात आली आहे. सध्या लाल समुद्रात भयंकर क्षेपणास्र आणि स्फोटकांनी भरलेले ड्रोन हल्ले सुरू आहेत. त्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी हा हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपात येणार; भाजपच्या खासदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा)
गुजरातमधील वेरावळ किनाऱ्यापासून २०० सागरी मैल अंतरावर हा हल्ला करण्यात आला. या जहाजाचा इस्रायलशी संबंध होता आणि ते भारतात येत होते, असे सांगितले जात आहे. इस्रायलचे कोणतेही जहाज त्यांचे लक्ष्य असेल, असे हौथींनी सांगितले होते. त्यामुळे या जहाजावर हौथींनी हल्ला केल्या संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा सध्या तपास सुरू आहे.
२० देशांसह सागरी दल तयार
यापूर्वी भारताने हुथी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एडनच्या आखातात दोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज विध्वंसक तैनात केले होते. संपूर्ण प्रदेशातील भारतीय जहाजांच्या संरक्षणासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. त्याच वेळी, हौथी बंडखोर त्यांचे हल्ले सातत्याने वाढवत आहेत आणि हे लक्षात घेता, अमेरिकेने प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यासाठी २० देशांसह सागरी दल तयार केले आहे. दरम्यान, हुथी बंडखोरांनी लाल समुद्राला अमेरिकेच्या जहाजांसाठी स्मशानभूमी बनवण्याची धमकी दिली आहे.
हेही पहा –