Deep Cleaning Drives : मुंबईतील उद्यान आणि क्रीडांगणे स्वच्छ राखण्याकडे महापालिकेचा कल

मुंबईतील सखोल स्वच्छता मोहिमेतंर्गत आता उद्याने आणि क्रीडांगण पूर्णपणे स्वच्छ केली जाणार असून झाडांच्या बुध्‍यांना चुन्याचा पांढरा रंग आणि गेरू पट्टे रंगवले जाणार आहे.

245
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?

मुंबईतील सखोल स्वच्छता मोहिमेतंर्गत आता उद्याने आणि क्रीडांगण पूर्णपणे स्वच्छ केली जाणार असून झाडांच्या बुध्‍यांना चुन्याचा पांढरा रंग आणि गेरू पट्टे रंगवले जाणार आहे. एवढेच नाही तर झाडांची छाटणी केली जावी आणि छाटणी केलेल्या फांद्या ताबडतोब साफ करण्यात येणार आहे. शिवाय रस्‍त्‍या/पदपथ/रस्ता दुभाजकांच्‍या लगतच्‍या झाडेझुडपे काढण्‍यात हा परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Deep Cleaning Drives)

राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईत उच्‍च दर्जाची स्‍वच्‍छता ठेवण्‍याकरीता संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्‍ह) उपक्रम राबविण्‍याबाबत आदेश दिलेले आहेत. त्‍या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनानुसार प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्‍यात आली आहे. या सुधारीत प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्‍वच्‍छता केली जाणार आहे. (Deep Cleaning Drives)

प्रसिध्द ठिकाणे बाजारपेठांच्या स्वच्छतेकडे लक्ष

या सुधारीत एसओपीमध्ये विभागातील कर्मचार्‍यांनी प्रसिदध ठिकाणे आणि बाजारपेठेत उपस्थित राहून त्यांची योग्य प्रकारे स्वच्छता झाली की नाही त्याची पाहणी करावी. तसेच बागेत योग्य व्यवस्था केलेली असावी जेणेकरुन अतिरिक्त मातीची सामग्री रस्त्यावर पडणार नाही. पदपथ/रस्त्यांवरील खांबांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करणे आवश्यक असल्याचे नमुद केले.रस्त्यावरील कोणतेही खड्डा, खंदक, असलेले खड्डे त्वरित भरले जावेत असे नमुद केले आहे. (Deep Cleaning Drives)

(हेही वाचा – Ghar Wapasi : छत्तीसगडमध्ये २४ डिसेंबरला १०१ कुटुंबे स्वीकारणार हिंदू धर्म)

संसर्गजन्य आजारांविरुध्द फवारणी

संसर्गजन्य आजारांविरूद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून फवारणी केली जाईल. तसेच परिसरातील सार्वजनिक शौचालये पूर्णपणे आणि नियमितपणे स्वच्छ केली जाईल. पर्जन्य जल वाहिनी विशेष उपकरणे वापरून स्वच्छ करण्यात येईल, तसेच मोठ्या/लहान पर्जन्य जलवाहिन्या मध्ये तरंगणारे साहित्य साफ करण्यासाठी पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या मदतीने व्यवस्था केली जाईल. कचरा फेकण्यावर आळा घालण्यासाठी व्यवस्था केली जाईल. एकदा रस्ते धुतले की, रस्ते विभागामार्फत रस्त्यावरील खुणा काढल्या जातील. सकाळी फिरण्याची ठिकाणी जेथे शक्य असेल तेथे रात्रीच्या वेळी रस्त्यांची साफसफाई केली जाईल. (Deep Cleaning Drives)

रस्ते व पदपथावरील अतिक्रमण हटणार

रस्ते व पदपथावरील सर्व अतिक्रमणे हटण्यात येणार असून सर्व बेकायदेशीर बॅनर/होर्डिंग्ज काढून टाकण्यात येतील. सर्व जंक्शनवरील स्टिकर्स/पॅम्प्लेट देखील काढले जाणार आहे. टोइंग वाहनांच्या सहाय्याने परिसरात उभी असलेली वाहने काढण्याची व्यवस्था केली जाईल. (Deep Cleaning Drives)

पार्क केलेल्या वाहनांखालील कचरा साफ करणार

स्वच्छता आणि चांगल्या नागरी सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी पथनाट्ये/फ्लॅश मॉब/पोवाडे/इतर लोककलाकारांची मदत घेतली जाईल. या मोहिमेदरम्‍यान , साचलेला आणि दुर्लक्षित राहिलेला कचरा, राडारोडा काढून टाकला जावा आणि आधी – नंतरची छायाचित्रे काढली जाणार आहेत. परिसरातील पार्क केलेल्या वाहनांखालील कचराही काढला जाईल.चाळी, झोपडपट्टी इत्यादी दाट लोकवस्‍तीच्‍या परिसरांमधील अंतर्गत गल्ल्या-बोळांमधील स्वच्छता केली जाईल. स्वच्छ शहराचा संदेश आणि इतर सामाजिक संदेश प्रसारित करण्यासाठी विद्यार्थी आणि ख्‍यातनाम व्यक्तींचा सहभाग असेल. (Deep Cleaning Drives)

(हेही वाचा – २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार; Manoj Jarange Patil यांची घोषणा)

विभागांनी या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला स्थानिक लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक संस्था, एनएसएस, यासारख्या स्वयंसेवी संस्था, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी इत्यादी यांना सहभागी करून घेतले जाईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग असणे आवश्यक आहे.या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत शालेय मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थी (सरकारी आणि खासगी संस्था दोन्ही) यांचा सहभाग शिक्षणाधिकारी यांनी सुनिश्चित करावा.लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि कार्यक्रमाची एकूण प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छतादूत या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सक्रिय असावे. (Deep Cleaning Drives)

अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी नियम न पाळणाऱ्या नागरिकांना क्लीन अप मार्शलदवारे दंडात्‍मक कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण स्वच्छता मोहिमेदरम्यान, वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जल वाहिनी विभाग, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांना आवश्यक अतिरिक्त वाहने आणि यंत्रसामग्री पुरवतील. (Deep Cleaning Drives)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.