Martyr Jawan Anil Kalsen: हुतात्मा जवान अनिल काळसेंवर रेठरे खुर्दमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते.

209
Martyr Jawan Anil Kalsen: हुतात्मा जवान अनिल काळसेंवर रेठरे खुर्दमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Martyr Jawan Anil Kalsen: हुतात्मा जवान अनिल काळसेंवर रेठरे खुर्दमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना मणिपूर येथे कर्तव्यावर असताना २१ डिसेंबरला अपघातात वीरमरण आले. ते भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांच्यावर शनिवार, २३ डिसेंबरला कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी विजय विभुते, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, अतुल भोसले, धैर्यशील कदम यांनी हुतात्मा अनिल कळसे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

(हेही वाचा – Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपकडून आठवड्याभराचा कार्यक्रम )

पोलीस आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकाकडून अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. वीरपत्नी सुनीता, आई लिलावती, वडील दिनकर, भाऊ बाळासाहेब, सुनील, मुलगा आयर्न आणि मुलगी श्रद्धा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आयर्न याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.