मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विकेंड सुट्टी तसेच नाताळ सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी झाली आहे. अनेक मुंबईकर पर्यटक घराबाहेर निघाले. त्यामुळे उर्से टोल नाक्यावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यावर लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी टोल कर्मचारी यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे. उर्से टोल नाक्यावरून वाहनांचा आढावा घेतला आहे..
अवजड वाहनांना बंदी घातली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. मात्र वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी आता पुण्यकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक 15-15 मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे.
(हेही वाचा २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार; Manoj Jarange Patil यांची घोषणा)
Join Our WhatsApp Community