Walk For Bonus : ‘या’ कंपनीत महिन्याला ५० किमी चाललं तरच मिळतो बोनस

कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त रहावं यासाठी कंपनीच्या मालकाने हा उपाय केला आहे. बोनस तुम्ही किती चाललात यावर अवलंबून असतो. 

386
Walk For Bonus : ‘या’ कंपनीत महिन्याला ५० किमी चाललं तरच मिळतो बोनस
Walk For Bonus : ‘या’ कंपनीत महिन्याला ५० किमी चाललं तरच मिळतो बोनस
  • ऋजुता लुकतुके

कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त रहावं यासाठी कंपनीच्या मालकाने हा उपाय केला आहे. बोनस तुम्ही किती चाललात यावर अवलंबून असतो. (Walk For Bonus)

तुम्ही वर्षभर केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला म्हणून तुम्हाला वर्षातील महत्त्वाच्या सणाला कंपनी बोनस देते. चीनमध्ये एका कंपनीने वर्षातून एकदा दिला जाणारा हा बोनस मासिक भत्त्यामध्ये बदलला आहे आणि तो ही कर्मचाऱ्यांना कामानुसार मिळणार नाहीए. तर ते महिन्यात किती किमी चालले यावरून त्यांना बोनस दिला जाईल. (Walk For Bonus)

(हेही वाचा – PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीत २०१९ चा रेकॉर्ड मोडायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)

दक्षिण चीनमध्ये गुआंगडोंग प्रांतातील ही कंपनी आहे डाँगपो पेपर कंपनी आणि साऊथ चीन मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीने अलीकडेच वार्षिक बोनस रद्द केला आहे आणि तो कर्मचाऱ्यांना महिन्याच्या महिन्याला मिळणार आहे. पण, कामावर नाही तर बोनस ते किती चालतात यावर अवलंबून असणार आहे. चीनमध्ये कंपनीचा हा फंडा वादग्रस्त ठरत आहे. (Walk For Bonus)

जर कर्मचारी महिन्याला ५० किमी चालले तर त्यांना पूर्ण बोनस देण्यात येईल. कर्मचारी ४० किमी चालले तर त्यांना ६० टक्के बोनस मिळेल. आणि ३० किंवा त्यापेक्षा कमी चालले तर मिळणारा बोनस ३० टक्के असेल. एखादा कर्मचारी महिन्याला १०० किमी चालला तर त्याला अतिरिक्त ३० टक्के बोनस मिळणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. कंपनीने आपल्या वेतन आणि बोनस धोरणात या अटी अधिकृतपणे लिहिल्या आहेत. (Walk For Bonus)

(हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आणि कल्व्हर्टचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट)

इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना व्यायामाचा प्रकार बदलण्याचाही पर्याय आहे. म्हणजे चालणे किंवा धावणे याऐवजी ते पर्वतारोहण किंवा वेगाने चालणे हा पर्यायही निवडू शकतात आणि त्यासाठी वेगळे निकष निश्चित करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड केलं जाईल आणि त्यावर कर्मचाऱ्यांची यातील कामगिरी तपासली जाईल. (Walk For Bonus)

डाँगपो पेपर कंपनीचे मालक लीन झियाँग यांच्या डोक्यातून ही कल्पना सुचली आहे आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना संदेश दिला आहे की, ‘कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं असेल तर कंपनी जास्त चालेल.’ लीन हे स्वत: गिर्यारोहक आहेत आणि त्यांनी दोनदा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. कंपनीत सध्या शंभरच्या वर कर्मचारी आहेत आणि प्रत्येकाला हे निकष पाळले तर बोनस मिळू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. (Walk For Bonus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.