मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असे विधान शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. ते मराठा आरक्षणप्रश्नी म्हणाले की, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बीडमध्ये जाहीर सभेत मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा शनिवारी जरांगे-पाटील यांनी केली. या घोषणेनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आरक्षणप्रश्नी मराठा समाजाला लवकरच न्याय मिळणार आहे. याप्रश्नी दाखल क्युरेटिव्ह पिटिशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही.’
(हेही वाचा – Shiv Sena : राष्ट्रवादीची आणखी एक माजी नगरसेविका शिवसेनेत, आणखी दोन लवकरच रडारवर)
न्यायालयाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला आहे. त्यामुळे सर्वांनी संयम राखण्याचे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community