सोमवारपासून नाताळ (Christmas) सण सर्वत्र साजार होईल. सर्वत्र वातावरण सुरू होण्यापूर्वीच मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने नाताळच्या संदर्भात सर्व खासगी शाळांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
जिल्हा शिक्षण अधिकारी विवेक दुबे असे या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे. दुबे यांनी मार्गदर्शक तत्त्वांबाबत एक निवेदन शाळेला जारी केलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, जर कोणत्याही शाळेच्या संचालकांनी पालकांच्या परवानगीशिवाय सांताक्लॉजच्या वेशात कोणत्याही मुलाला कार्यक्रमात सहभागी करून घेतले, तर संबंधित शाळेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. विश्व हिंदू परिषदेने भोपाळमधील शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदू मुलांना सांताक्लॉज बनण्यास भाग पाडू नये, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर… )
Join Our WhatsApp Community