मोहम्मद रफी (Mohammad Rafi) हे नाव भारतात काय तर जगात देखील सर्वपरिचित आहे. मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजाने सर्वांना तृप्त केले आहे. त्यांना आदराने रफी साहब म्हटले जायचे. त्यांना शहेनशाह-ए-तरन्नुम असेही म्हटले जाते. त्यांच्या आवाजाने त्यांच्या अनेक नवोदित गायकांना प्रेरणा दिली. यापैकी सोनू निगम, मुहम्मद अझीझ आणि उदित नारायण ही नावे उल्लेखनीय आहेत.
मोहम्मद रफी (Mohammad Rafi) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक होते. आपल्या आवाजातील गोडव्यामुळे त्यांनी आपल्या समकालीन गायकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मोहम्मद रफी यांना जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. मोहम्मद रफी यांनी पहिले गाणे १९४४ मध्ये गुल बलोच या पंजाबी चित्रपटासाठी गायले. १९४६ मध्ये मोहम्मद रफी यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. संगीतकार नौशाद यांनी त्यांना सर्वप्रथम आप नावाच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली.
यानंतर रफी साहेबांनी शहीद, मेला आणि दुलारीमध्येही गाणी गायली जी खूप प्रसिद्ध झाली. १९५१ मध्ये, नौशाद जेव्हा बैजू बावरा चित्रपटासाठी गाणी तयार करत होते, तेव्हा त्यांनी त्यांचा आवडता गायक तलत मेहमूद यांच्याकडून गाण्याचा विचार केला होता. असं म्हणतात की एकदा तलत मेहमूद यांना सिगारेट ओढताना पाहून त्याने आपला विचार बदलला आणि रफी साहेबांना गाण्यास सांगितले. बैजू बावराच्या गाण्यांनी रफी साहेब त्यांच्या काळातले मोठे गायक झाले. यानंतर नौशाद यांनी रफी यांना त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक गाणी गायला दिली.
(हेही वाचा Christmas: परवानगीशिवाय सांताक्लॉज बनवलात तर शिस्तभंगाची कारवाई, शिक्षण अधिकाऱ्यांचे शाळांना पत्र)
९८० पर्यंत त्यांनी एकूण ५,००० गाणी गायली
१९८० पर्यंत त्यांनी एकूण ५,००० गाणी गायली. मुख्य प्रवाहातील हिंदी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी गझल, भजन, देशभक्तीपर गाणी, कव्वाली आणि इतर भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांनी मराठी गाणी देखील गायली आहेत. ’हा रुसवा सोड सखे’ हे मराठी गाणे ऐकताना आपण सहज नकळत रोमॅंटिक मूडमध्ये जातो.
२४ डिसेंबर २०१७ रोजी, मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त, Google ने त्यांचा गौरव केला आणि गुगल डूडल तयार केले होते. हे डूडल मुंबईचे चित्रकार साजिद शेख यांनी तयार केले होते. रफी साहेबांचा आवाज दैवी होता, त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. जनू स्वर्गलोकातून ते थेट पृथ्वीतलावर आले असावेत आणि पृथ्वीवर लोकांचे मनोरंजन करुन पुन्हा देवलोकात देवतांचे मनोरंजन करण्यास गेले असावेत.
Join Our WhatsApp Community