Aaditya L-1 update : आदित्य एल -१ ‘या’ दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचेल

सूर्याच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आलेले भारताचे आदित्य-एल १ हे यान येत्या ६ जानेवारी रोजी आपल्या निर्धारित वेळेत लॅन्ग्रेज पॉइंट -१ वर पोहचणार असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली.

189
Aaditya L-1 update : आदित्य एल -१ 'या' दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचेल
Aaditya L-1 update : आदित्य एल -१ 'या' दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचेल

आदित्य एल -१ बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. आदित्य एल -१ त्याला दिलेल्या निश्चित वेळेत म्हणजेच ६ जानेवारी २०२४ रोजी लॅन्ग्रेज पॉईंट(LANGREJ POINT) १ वर पोहचणार आहे. पृथ्वीपासून याचे अंतर १.५ दशलक्ष मीटर अंतरावर आहे. अशी महिती भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी (२२ डिसेंबर) दिली. अशी माहिती पीटीआय ने दिली आहे. (Aaditya L-1 update)

भारतीय विज्ञान या स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या विज्ञान संमेलनाच्या कार्यक्रमावेळी स. सोमनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यापुर्वी आदित्य-एल १ वरील सोलार विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) या उपकरणाने महत्त्वाचा डेटा रेकॉर्ड केला आहे. हिस्टोग्राम २ दिवसांत सोलर विंड आपन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) द्वारे टिपलेल्या प्रोटॉन आणि अल्‌फा कणांच्या संख्येतील उर्जा भिन्नता दर्शवितो. स्विस या उपकरणाने दोन दिवसांच्या काळातील सूर्याच्या किरणांचा अभ्यास करुन, त्यातील प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल काउंटमधील फरक नोंदवला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या सौर मोहीमेतून अनेक रहस्य उलगडणार
आदित्य-एल1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. या मोहिमेशी संबंधित सर्वात महत्त्वाचा पेलोड म्हणजे व्हिजिबल लाइन एमिशन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) हा पेलोड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने बनवला आहे. सूर्ययानला ७ पेलोड आहेत. त्यापैकी सहा पेलोड इस्रो आणि इतर संस्थांनी बनवले आहेत.
आदित्य-एल-1 (ADITYA L 1) अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 कक्षेत ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच, सूर्य आणि पृथ्वी प्रणालीमधील पहिला लॅग्रॅन्जियन बिंदू. याच ठिकाणी आदित्य-एल1 तैनात असेल. लॅन्ग्रेज पॉइंट खरेतर अंतराळातील पार्किंग आहे. जिथे अनेक उपग्रह तैनात करण्यात आले आहेत.

(हेही वाचा : Weather Forecast: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहणार, वाचा हवामानाचा अंदाज)

व्हीईएलसी पेलोडचे मुख्य अन्वेषक राघवेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, भारताचे सूर्ययान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर या ठिकाणी तैनात असेल. या ठिकाणाहून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ते सूर्याजवळ जाणार नाही. सूर्ययानमध्ये स्थापित व्हीईएलसी सूर्याचा एचडी फोटो घेत आहे. पीएसएलव्ही रॉकेटमधून हे यान (ADITYA L 1) प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या पेलोडमध्ये लावलेला वैज्ञानिक कॅमेरा सूर्याची उच्च रिझोल्यूशनची छायाचित्रे घेत आहे . यासोबतच स्पेक्ट्रोस्कोपी आणि पोलरीमेट्रीही केली जाणार आहे. तर सूर्याबद्दल अधिक न माहिती असलेली रहस्येही उलगडणार.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.