देशातील अनेक भागात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे, तर काही ठिकाणी धुके आणि ढगाळ हवामान आहे. राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे (Weather Forecast) राहणार असून तापमानात थोडी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याशिवाय डोंगरावर बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने राज्यातही थंडी कायम आहे. अनेक भागात १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे. रविवारी तापमानात काही प्रमाणात चढ उत्तर होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही गारठा कायम राहणार आहे.
(हेही वाचा – Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, वाहनचालकांनी ‘या’ सूचनांची करावी अंमलबजावणी )
२५ डिसेंबर पर्यंत तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. देशाच्या उत्तर भागात थंडीची घट होण्याची शक्यता असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट असून येथील गारठा जास्त वाढला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानात फारसा बदल होणार नाही. २६ डिसेंबरनंतर साऊथ इस्टर्ली वाऱ्यांचा प्रभाव वाढेल, यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात हवामान कोरडे राहून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवस रात्री उशिरा आणि पहाटे हलकेसे धुके पडण्याची शक्यता आहे
हेही पहा –