सौदी अरेबियाहून कच्चे तेल घेऊन भारतातील मंगळुरूला जाणाऱ्या इस्रायली जहाजावर हिंद महासागरात (Drone attack) ड्रोनने हल्ला करण्यात आला. जहाजावर आगीची घटना घडल्याची बातमीही माहितीही देण्यात आली होती, या जहाजात २० कर्मचारी होते, मात्र हे सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने तटरक्षक दलाचे गस्ती जहाज (गार्ड पेट्रोलिंग) आय. सी. जी. एस. विक्रम पाठवले आहे.
ब्रिटीश लष्करी युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स आणि सागरी कंपनी एम्ब्रे (मेरिटाईम फर्म एम्ब्रे) यांच्या म्हणण्यानुसार, वेरावळजवळ इस्रायली व्यापारी जहाज एम. व्ही. केम प्लुटोवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. सुरुवातीच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ड्रोन हल्ल्याच्या वेळी हे जहाज भारतातील वेरावळ (सोमनाथ) पासून सुमारे २०० सागरी मैल (३७८ कि. मी.) अंतरावर होते.
(हेही वाचा – Aaditya L-1 update : आदित्य एल -१ ‘या’ दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचेल)
या हल्ल्यात हौथी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आयसीजीएस विक्रम पोरबंदर अरबी समुद्रातून व्यापारी जहाज एमव्ही केम प्लुटोकडे रवाना झाले आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे जहाज सौदी अरेबियाहून मंगळूरला कच्चे तेल घेऊन जात होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community