पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि तिकीट काढून प्रवास करण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी ‘मेरा टिकट मेरा ईमान’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व स्तरांतील स्पर्धकांनी प्रवासाबाबत छोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायचे आहे. तसेच सर्वाधिक लाईक्सच्या आधारे पश्चिम रेल्वे कडून तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. (Western Railway )
मेरा टिकट मेरा ईमान स्पर्धा
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट खरेदीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, विनातिकीटात प्रवासाला आळा घालण्यासाठी एक कल्पना मांडली आहे. २५ डिसेंबर ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत मेरा टिकट मेरा ईमान स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धकांना लोकल प्रवासाबाबत व्हिडिओ बनवून पश्चिम रेल्वेच्या फेसबूक, इन्स्टाग्राम, यू-टयूब आणि ट्विटर @drmbct ला टॅग करायचे आहे. Western Railway
(हेही वाचा : Manipur: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात एके 56 रायफल, सिंगल बॅरल बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विजेत्यांची घोषणा
स्पर्धेतील अति आणि नियमांसह गुगल फॉर्म क्युआर कोड स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्हीडीओची पूर्वनिर्धारित निवड निकषांवर आधारीत तपासणी केली जाईल. व्हीडीओच्या स्क्रीनिंग नंतर तो पुढील ट्रेंडिंग स्पर्धेचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या फेसबूक, इन्स्टाग्राम, यू-टयूब अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर अपलोड केला जाईल. यातील तीन व्हीडीओ जास्तीतजास्त लाईकस मिळतील त्याआधारे विजेते निवडले जाणार आहे. या संकल्पनेची २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विजेत्यांची घोषणा केली जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community