Restaurant on Wheels : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुरू केले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’

जुन्या रेल्वे डब्याचा वापर करून प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' या रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.

199
Restaurant on Wheels : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुरू केले 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'
Restaurant on Wheels : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुरू केले 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'

प्रवाशांच्या सोयीसाठी आता सीएसएमटी स्थानकानंतर आता लोकमान्य टिळक टर्मिनस(Lokmanya Tilak Terminus) येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ (Restaurant on Wheels) हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. शनिवारी (२३ डिसेंबर) याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे मुंबईकर खवय्यांना शाही भोजनाचा लाभ घेता येणार आहे. (Restaurant on Wheels )

जुन्या रेल्वेच्या डब्याचा वापर

रेल्वे प्रवाशांना चांगल्या सेवा देणे तसेच एक नाविन्यपूर्ण महसूलाचा स्रोत शोधण्यासाठी, मध्य रेल्वे मुंबई विभागाने  ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले आहे.या उपक्रमात जुन्या रेल्वेच्या डब्याचा वापर करून जेवणाच्या जागेत समाविष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हे अतिशय सोयीचे ठरणार आहे. (Central Railway)

रेल्वेच्या महसुलात वाढीचा उद्देश 

एल. टी. टी. हे शहरातील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे, येथून दररोज सुमारे सरासरी ७० हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “रेल्वेच्या महसुलात लक्षणीय योगदान देतानाच प्रवाशांचा एकूण चांगल्या सोयी सुविधा देणे हा या जागेचा उद्देश आहे.हल्दीरामच्या सहकार्याने भारतीय रेल्वेच्या विना-भाडे महसूल योजनेंतर्गत विकसित केलेल्या एल. टी. टी. येथील कोच रेस्टॉरंटमध्ये ४० ग्राहकांच्या आसनक्षमता आहे.२०२१ मध्ये सी. एस. एम. टी. येथे अशाच प्रकारच्या सुविधेने झपाट्याने लोकप्रियता मिळवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या सी. एस. एम. टी. पुनर्विकास प्रकल्पामुळे पहिले ‘रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स’ तात्पुरते बंद करावे लागले.  (Restaurant on Wheels )

(हेही वाचा : Western Railway : फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेची नवीन कल्पना; स्पर्धेचे आयोजन)

‘या’ स्थानकातही सुरु होणार हा उपक्रम
तर याच प्रकल्पांतर्गत ज्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते अशी काही स्थानके निवडण्यात आली आहे. तसेच यात काही स्थानके अशी आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यातील दादर स्थानकात असे ‘रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विभागातील कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान यासारखी महत्वाची ठिकाणे प्रवासी-स्नेही उपक्रमांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.