पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहराच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. नागरिकांसाठी स्वच्छता गृहाची माहिती एका ‘टॉयलेट सेवा ॲप’वर पाठविण्यात आली आहे.पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या टॉयलेट सेवा ॲप चा पुढचा टप्पा महापालिकेने सुरू केला असून आता स्वच्छ पुणे ठेवण्यासाठी मदत होणार आहे. (Pune Toilet Seva App)
सार्वजनिक शौचालयांची माहिती होणार उपलब्ध
टॉयलेट सेवा ॲप’ हे आता पुणे शहरातील ११८३ सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती यावरून मिळण्यास मदत होणार आहे. तर केंद्र सरकारच्या २०२३ स्वच्छ शौचालय उपक्रमाच्या आधाराने स्वच्छ शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
(हेही वाचा : International Monetary Fund : …तर 2028 पर्यंत देशावर जीडीपीच्या 100 टक्के कर्ज असेल – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा)
जवळचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी ठरणार उपयुक्त
ॲपवर जवळचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोपं किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाईट महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स आदी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत पुणे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये सर्व शौचालयांमध्ये क्यूआर कोड बसविण्यात आले ज्यामुळे आतापर्यंत १०० फीडबॅक सबमिशन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community