Malnutrition In Children : ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन कृतीशील

Malnutrition In Children : मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच आरोग्य तपासणी आणि पोषक आहार देऊन, पालकांसोबत चर्चा करण्यात आली

190
Malnutrition In Children : ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन कृतीशील
Malnutrition In Children : ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन कृतीशील

ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी “कुपोषण मुक्तीसाठी दत्तक- पालकत्व अभियान” जिल्हा परिषद ठाणे (Zilla Parishad Thane) मार्फत राबविण्यात येत आहे. (Malnutrition In Children) अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या ८३, तर मॅम बालकांची संख्या ११६१ इतकी आहे.

(हेही वाचा – International Monetary Fund : …तर 2028 पर्यंत देशावर जीडीपीच्या 100 टक्के कर्ज असेल – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा)

सॅम बालके म्हणजे अतितीव्र कमी वजन असलेली बालके, तर मॅम बालक म्हणजे तीव्र स्वरूपात कमी वजन असलेला बालक असे म्हटले जाते. सॅम आणि मॅम बालकांची संख्या पुढील सहा महिन्यांत शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा, तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येकी एक बालक दत्तक देण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली सोयी-सुविधांची पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल (Manuj Jindal) यांनी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच आरोग्य तपासणी आणि पोषक आहार देऊन, पालकांसोबत चर्चा करण्यात आली. खराडे, निमन पाडा, प्रकल्प डोळखांब, शहापूर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन वजन काटा, पोषण आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, अंगणवाडीतील पाणीपुरवठा इत्यादी सर्व सोयीसुविधांची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखांब येथे बाल उपचारकेंद्र येथे भेट देऊन आरोग्य विषयक सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली.

(हेही वाचा – Western Railway : फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेची नवीन कल्पना; स्पर्धेचे आयोजन)

कुपोषित बालकांच्या घरी भेट

या वेळी डोळखांब, शहापूर येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)  अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, अर्थ विभागप्रमुख वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत कुपोषित बालकांच्या आरोग्याच्या समस्या (Health problems) जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी यांनी दत्तक घेतलेल्या बालकांच्या घरी भेट दिली. (Malnutrition In Children)

पालकांचे आरोग्य विषयक समुपदेशन

सर्व अधिकारी यांना कुपोषित दत्तक पालकत्व अभियानांतर्गत (Malnutrition Adoption Campaigns) दत्तक घेतलेल्या बालकांचे पंधरा दिवसांनी संपर्कात राहून आरोग्य विषयक माहिती घेण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकांच्या आरोग्य विषयक माहिती दररोज घेण्यासाठी गृहभेट देऊन माहिती घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. पालकांसोबत आरोग्य विषयक समुपदेशन (Health Counselling) करण्यासाठी, स्वच्छतेचे महत्त्व (Importance of hygiene), पोषक आहार (Nutritious food) कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेतली जावी, असे सांगण्यात आले. (Malnutrition In Children)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.