Corona : देशभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, नव्या व्हेरिएंटचे वेगळे लक्षण कोणते? जाणून घ्या…

कोरोनाच्या जेएन.१ नव्या व्हेरियंटची लागण झालेल्यांना घशात खवखव होणे हे वेगळे लक्षण दिसून येत आहे.

256
Corona : देशभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, नव्या व्हेरिएंटचे वेगळे लक्षण कोणते? जाणून घ्या...
Corona : देशभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, नव्या व्हेरिएंटचे वेगळे लक्षण कोणते? जाणून घ्या...

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-1 चा (Corona) फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. देशात सध्या ३७४२ सक्रीय कोरोना रुग्ण असून गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ३२२ नवे रुग्ण सापडले आहेत.

यासोबतच शनिवारी दिवसभरात केरळमध्ये आणखी एका कोविड बळीची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये शनिवारी १२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. याच दिवशी कर्नाटकात ९६, महाराष्ट्रात ३५, तर दिल्लीमध्ये १६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी एका दिवसात देशात ४०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेने शनिवारी समोर आलेली रुग्णसंख्या कमी असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या जेएन.१ नव्या व्हेरियंटची लागण झालेल्यांना घशात खवखव होणे हे वेगळे लक्षण दिसून येत आहे.

(हेही वाचा – Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैनिकाचे कोर्ट-मार्शल, नोकरीवरून बडतर्फ करून 5 वर्षांच्या कैदेची शिक्षा)

गंभीर लागण झाल्यास किंवा उपचार न घेतल्यास चक्क आवाजही जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वेगळा असला, तरी तो जास्त घातक किंवा धोकादायक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जुन्याच लसींचा वापर करून याला आळा घालणे शक्य असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.