मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. शनिवारी रात्री १० ते १२ किमीच्या रांगा लागल्या होत्या. त्यात महामार्गावर अनेक वाहने बंद पडल्याने मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागला होता, मात्र आता ही कोंडी अखेर ३५ तासांनी सुटली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
पोलिसांनी मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन्ही लेनवरून सुरू ठेवल्याने मार्ग निघाला. वाहतूक कोंडी झाल्यामुळे रात्रभर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे रायगड पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. महामार्गावरील कोंडी सुटल्याने पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
(हेही वाचा – Pune Toilet Seva App : पुणेकरांसाठी ‘टॉयलेट सेवा ॲप’; शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक पाऊल)
सलग सुट्ट्या असल्याने अनेकजण आपल्या कुटुंबियांसह फिरण्यासाठी बाहेर पडले, मात्र त्यांना द्रुतगती महामार्गावर तासनतास अडकून बसावे लागले, मात्र आता वाहतूक कोंडी सुटल्यामुळे नागरिकांना प्रवास सुखकर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community