भारत विरोध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला संघातील कसोटी सामन्यात (IND W vs AUS W) भारतीय संघाने विक्रम केला. भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने तब्बल ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासोबत १० कसोटी सामने खेळले त्यातील ४ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे , तर ६ अनिर्णित ठेवण्यात यश आले.
भारतासमोर अवघे ७५ धावांचे होते लक्ष्य
रविवार, २४ डिसेंबर राय वानखेडेमध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारतीय संघाने विजय मिळवला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा झाल्या होत्या. त्यांच्याकडे ४६ धावांची आघाडी होती. कांगारूंचा संघ चौथ्या दिवशी २६१ धावांत गुंडाळला. त्यांना एकूण ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघे ७५ धावांचे लक्ष्य होते. स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. रिचा अंजनाने १३ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज १२ धावांवर नाबाद राहिली. शफाली वर्माला केवळ ४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये १९७७ पासून आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.