Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत ८ ते १२ जानेवारीदरम्यान सुनावणी होणार आहे.

206
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत ८ ते १२ जानेवारीदरम्यान सुनावणी होणार आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), पुणे (Pune) शहराच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Commissioner of Police Rashmi Shukla), हवेलीच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम (Sub Divisional Officer Jyoti Kadam), तसेच एल्गार (Elgar) परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार (harshali potdar) यांचीही उलटतपासणी होणार आहे.

(हेही वाचा – Detonators Seized in Raigad : धक्कादायक; रायगड जिल्ह्यात 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डिटोनेटर हस्तगत)

दोन सदस्यीय आयोगाकडून चौकशी

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल (J. N. Patel) आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक (Sumit Malik) असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी सुरू आहे.

आंबेडकर, शुक्ला, पोतदार आणि कदम यांची उलटतपासणी

त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार ८ ते १२ जानेवारीदरम्यान आंबेडकर, शुक्ला, पोतदार आणि कदम यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. सुनावणीच्या या नियोजनात गरजेनुसार बदल होऊ शकतो, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. (Koregaon Bhima)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.