‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारा’च्या माध्यमातून डोंबिवलीत एका कार्यक्रमात अयोध्येतील श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. (Rammandir Dombivli) ते भव्य मंदिर कसे असेल याची अनुभूती कल्याण – डोंबिवलीसह परिसरातील लाखो रामभक्तांना अनुभवता यावी, यासाठी आवर्जून ती प्रतिकृती पहाण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. या राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते करण्यात आले असून या राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे.
(हेही वाचा – Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी)
अयोध्येतील राममंदिराच्या पार्श्वभूमीवर भाविक
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होऊन भाविकांसाठी ते खुले केले जाणार आहे. अनेक वर्षांचे देशासह विदेशातील रामभक्तांचे हे स्वप्न पूर्ण होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अयोध्या (Ayodhya) परिसरात रामभक्त त्या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
राममंदिराची प्रतिकृती पहाता येण्यासाठी प्रतिकृती
स्थानिक पातळीवर देखील स्थानिक नागरिकांना राममंदिराची प्रतिकृती कशी आहे, हे पहाता यावे; म्हणून डोंबिवली जिमखाना येथे सांस्कृतिक परिवाराच्या (Sanskritik Parivar) माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या संकल्पनेतून राममंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या राममंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
(हेही वाचा – Firing : सायन-चुनाभट्टी येथे गोळीबार; गुंड सुमित येरूनकर ठार, तीन जखमी)
६० फूट बाय ४० फूट उंच आकाराची प्रतिकृती
कल्याण (Kalyan) – डोंबिवलीतील (Dombivli) रामभक्त मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. ६० फूट बाय ४० फूट उंच आकाराची ही राममंदिराची प्रतिकृती असून ज्येष्ठ आणि प्रसिध्द कला दिग्दर्शक उदय अरविंद इंदप आणि त्यांची कन्या सानिका इंदप यांनी मागील काही महिने मेहनत घेऊन या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. या प्रतिकृतीच्या कळसाची उंची ४० फूट असून मंदिर प्रतिकृती उभारणीत फॅब्रिकेशन, प्लायवुड, प्लास्ट्र ऑफ पॅरिस साधनांचा वापर करण्यात आले आहे. (Rammandir Dombivli)
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई त्याच बरोबर मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय जय श्री राम गाण्याची धून भक्तांच्या कानी गुंजणार आहे. आज या राममंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले असून या राममंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे. (Rammandir Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community