Drugs Free Mumbai : ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

219
Drugs Free Mumbai : ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
Drugs Free Mumbai : ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल, तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ (Drugs Free Mumbai) करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले.

(हेही वाचा – Rammandir Dombivli : डोंबिवली येथे उभारली राममंदिराची प्रतिकृती; 2 महिने घेता येणार दर्शन)

उमंग २०२३ मध्ये केले विधान

मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) यांच्या वतीने शनिवारी रात्री वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर (Jio World Convention Centre) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०२३’ (Umang 2023) या सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व कलाकारांचे आभार 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्याचे कार्य आपणाकडून होत आहे. मुंबई (Mumbai) शहर सर्वांत सुरक्षित शहर ही ओळख करून देण्याचे काम मुंबई पोलीस करतात. मुंबई पोलीस आणि त्यांच्या परिवारासाठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत वर्षातून एकदा उमंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करतात, याबद्दल सर्व कलाकारांचे त्यांनी आभार मानले.

(हेही वाचा – Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी)

पोलिसांसाठी शासन अग्रेसर रहाणार

मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. आपल्याला ड्रग्ज (Drugs) विरोधात लढा लढावा लागेल. मुंबई पोलिसांनी हा लढा सुरू केला आहे. तो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याकरीता तुमची सर्वांची मदत, श्रम आवश्यक आहेत, असे सांगून तुम्ही हे निश्चित करून दाखवाल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पोलीस आमच्यासाठी अहोरात्र काम करतात, त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ती प्रत्येक गोष्ट करण्याकरिता शासन नेहमीच अग्रेसर राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. (Drugs Free Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.