Ajit Pawar : मी ६० वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी ३८व्या वर्षी घेतली; अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर केली टीका

279

मी ६० वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी ३८व्या वर्षी वसंतदादांना मागे सारल्याचे विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केले. माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगले नेतृत्व होते. मात्र तरी त्यांना बाजूला करण्यात आले आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन केली, असा निशाणा अजित पवारांनी शरद पवारांवर साधला.

बारामतीकरांनो, कठोर भूमिका घ्यावी लागेल

बारामतीकरांनो, थोडासा दम धरा आणि इथुन पुढे फक्त माझ एका, बाकी कोणाच ऐकू नका. बाकीच्याच लय वर्ष कोणाकोणाच ऐकले. आता माझ ऐका. मी तुम्हाला असे काही करुन दाखवितो, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. बारामतीकरांच्या भक्कम पाठिंब्यावर मी आज उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रिपदापर्यंत पोहचलो. जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहेत. तोपर्यंत मी विकासकामांना कमी पडणार नाही. मात्र, मला सर्वांना सांगायच आहे, तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. ज्याला माझ्या बरोबर रहायच आहे. त्यांनीच रहावे. इकडेपण तिकडेपण चालणार नाही, असे अजित पवारांनी सांगितले. आज देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही. मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे आले आहे. तुम्ही खरगे आणि नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर आणा, भारतीय नागरीक कोणाला मतदान करणार, लोकसभा निवडणुकीचे मतदान पंतप्रधानांचा चेहरा पाहुनच होईल, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

(हेही वाचा Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.