माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) सोमवार, २५ डिसेंबरला देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची ही ९९ वी जयंती आहे. देशभरातील भाजप मुख्यालयात त्यांनी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी २०२४ मध्ये त्यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होणार आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सदैव अटल स्मारक “ला भेट देऊन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. जयंतीनिमित्त अटल स्मारकाची सजावट करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. अटलजींची दत्तक कन्या नमिता कौल भट्टाचार्य आणि नात निहारिका देखील स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करतील.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : गाझामध्ये सापडले भुयाराचे मोठे जाळे, आतील व्यवस्था पाहून इस्रायली लष्कराने व्यक्त केले आश्चर्य )
तीन वेळा देशाचे पंतप्रधान !
अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान झाले. बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. १९९८ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर १३ महिन्यांनी १९९९मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. २००४ पर्यंत ते या पदावर होते.
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यांच्या हस्ते पुरस्कार
मोदी सरकारकडून अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. अटल बिहारी वाजपेयी हे देशातील अशा नेत्यांपैकी एक होते ज्यांना पक्षाबाहेरीलही सर्वांकडून आदर मिळाला. डिसेंबर २०१४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. मार्च २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिष्टाचार मोडला आणि अटलजींना त्यांच्या निवासस्थानी भारतरत्न प्रदान करण्यात आला.
हेही पहा –