Water Storage: नवीन वर्षात महाराष्ट्रात पाणी संकट येण्याची शक्यता, राज्यातील धरणांमध्ये किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांतील जलसाठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे.

212
Water Storage: नवीन वर्षात महाराष्ट्रात पाणी संकट येण्याची शक्यता, राज्यातील धरणांमध्ये किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर
Water Storage: नवीन वर्षात महाराष्ट्रात पाणी संकट येण्याची शक्यता, राज्यातील धरणांमध्ये किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर

राज्यात राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा सर्वांत कमी म्हणजे ३६.७१ टक्के इतकाच शिल्लक आहे. वेगाने घटत असलेल्या पाणीसाठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणीकपातीचे (Water Storage) संकट उभे ठाकले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांतील जलसाठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून, जवळपास ७८ टक्के पाणीसाठा अजूनही उपलब्ध आहे.

(हेही वाचा – Mumbai Pune Expressway: सलग सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्यांची गर्दी वाढली, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा)

राज्यातील अनेक विभागांत पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्यानंतरच पाणीकपातीचे संकट उभे राहिले होते. राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, पाणीटंचाईमुळे ३८९ टँकरने ९६१ वाड्यांना, तर ३६६ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमध्ये जलसाठा कमी होत आहे. रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीने राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकली.

राज्यातील पाणीसाठा

प्रत्येक धरणात असलेला जलसाठा, मागील वर्षी आणि या वर्षीची आकडेवारी याप्रमाणे आहे.

उजनी – १८.४३टक्के -१००टक्के

जायकवाडी-४३.३९ टक्के-९१.७७ टक्के

गोसिखुर्द-५०.४४ टक्के-५८.०५ टक्के

तोतलाडोह-७४.४२ टक्के-८२.८२ टक्के

इसापूर-७६.३६ टक्के-९१.३९ टक्के

कोयना-७६.०५ टक्के-८५.८५ टक्के

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.