Jammu & Kashmir : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, एलओसीजवळ सुरक्षा दलांनी जप्त केली शस्त्रे

पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.50 च्या सुमारास खोर परिसरातील चन्नी दिवानो गावातील एका मैदानात ही शस्त्रे सापडली. लष्कर आणि पोलिसांनी तातडीने संयुक्त मोहीम सुरू केली आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने पाकिटं उघडण्यात आली.

213
Jammu & Kashmir : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, एलओसीजवळ सुरक्षा दलांनी जप्त केली शस्त्रे
Jammu & Kashmir : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, एलओसीजवळ सुरक्षा दलांनी जप्त केली शस्त्रे

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने(Indian Army) हाणून पाडला आहे. खरे तर, सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. यात मोठ्या प्रमाणात आयईडी शस्त्रे आणि स्फोटक सामग्रीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२४ डिसेंबर) सकाळी ७.५० वाजता खोरे परिसरातील चन्नी दिवानो गावातील एका मैदानात शस्त्रांची पाकिटे सापडली.याबाबत माहिती मिळताच घटना स्थळी पोहचून पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या याबाबत तपास सुरु केला आहे. (Jammu & Kashmir )

स्फोटके जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने स्फोटके उघडण्यात आली, ज्यामध्ये सहा आयईडी, एक ९ एमएम इटालियन बनावटीचे पिस्तूल, तीन मॅगझिन, ३० राऊंड, एक हातबॉम्ब, ३५,००० रुपये रोख, एक टेप, रिलिझिंग कार्ड, झिप प्रकारचे प्लास्टिक सापडले. पोलीस आणि लष्कराने परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे. ही शस्त्रे कोणाची आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, पोलिसांनी अचूक वेळी शस्त्रे जप्त केली. (Jammu & Kashmir )

परिसरात भीतीचे वातावरण 

खोरे परिसरातील चन्नी दिवानो गावाच्या मोकळ्या मैदानात शस्त्रे सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तर हे सारखेच घडत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्या लोकांना समजावून सांगितले अजिबात घाबरून जाऊ नका आम्ही तपास करत आहोत. परिसरात कोणीतरी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय आहे. जो असेल त्याला लवकरच अटक केली जाईल असेही आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

(हेही वाचा : JN.1 update : खबरदारी घ्या! JN.1चे ठाण्यात एकाच दिवसात पाच रुग्ण; देशातील आकडेवारी काय जाणून घ्या)

अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवाया

लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खोऱ्यात अशांतता आणि दहशत पसरवण्याचे प्रयत्न सीमेपलीकडून केले जात आहेत. दरम्यान, या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. रविवारी (२४डिसेंबर) सकाळी दहशतवाद्यांनी एका निवृत्त एस. एस. सी. जवानाची गोळ्या घालून हत्या केली. यापूर्वी गुरुवारी लष्कराच्या दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. यात चार तरुणांचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.