ऋजुता लुकतुके
बीएमडब्ल्यू (BMW X6) कंपनीने आपली एक्स५ एसयुव्ही आणि एक्स६ एसयुव्ही कूप या गाडींच्या मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. त्याचबरोबर नवीन रंगांमध्ये ही गाडी कंपनीने लाँच केली आहे. मर्सिडिज कंपनीने आपल्या जीएलई गाड्यांमध्ये केलेल्या बदलांनंतर बीएनडब्ल्यूही (BMW X6) त्याच वाटेनं गेली आहे.
या गाड्यांचे नवीन रंगही लक्ष वेधून घेणारे आहेत. फिचर्स बद्दल बोलायचं तर नवीन मॉडेलमध्ये हेडलाईट्स थोडे लहान आहेत. आणि मॅट्रिक्स एलईडी दिव्यांची रचनाही बदलली आहे. गाडीच्या आतील डिस्प्ले हा वक्राकार आहे. आणि यात इन्फोटेन्मेंटचा डिस्प्ले हा १४.९ इंचांचा आहे. तर चालकाजवळ असलेला डिस्प्ले १२.३ इंचांचा आहे. डिस्प्लेची ऑपरेटिंग सिस्टिमही अद्ययावत करण्यात आली आहे.
(हेही वाचा-Pandit Madan Mohan Malviya : ’सत्यमेव जयते’ला लोकप्रिय बनवणारे पंडित मदन मोहन मालवीय जीवन परिचय)
Feel the presence, and experience the sophistication.
The new BMW X6.#THENEWX6
__
The #BMW X6 M60i xDrive:
Fuel consumption/100km, CO2 emission/km comb.: 12.3–11.4 l, 279–258 g. According to WLTP, https://t.co/twXzMrWMl3. pic.twitter.com/g2773sMksL— BMW (@BMW) February 9, 2023
या गाडीत ३ लीटरचं ६ सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ३१३ बीएचपी शक्ती आणि ४५० एनएम टॉर्क निर्माण करू शकतं. गाडीत ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर आहेत. तर शून्य ते १०० किमीचा वेग गाठण्यासाठी या कारला फक्त ४ सेकंदांचा वेळ लागतो. या गाडीतील बॅटरी २५.७ केडब्ल्यूएच क्षमतेची आहे. आणि यात एका चार्जमध्ये गाडी ११० किलोमीटरपर्यंत धावू शकते.
गाडीची किंमत १.११ कोटी रुपयांपासून सुरू होते. भारतात डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ च्या सुरुवातीला ही गाडी लाँच होऊ शकते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community