सुजित महामुलकर
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक चकमक महाराष्ट्राला नवी नाही मात्र पाटील आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावर घसरले. त्यांनी पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. “मुला-मुलीच्या नावापुढे आईचे नाव लावा असं काही जण म्हणतात मग आईची जात लावा हे बोलण्यासाठी काहींचे तोंड का उघडत नाही,” अशा शब्दात पाटील यांनी पवारांना कानपिचक्या दिल्या.
मग का दुखते?
काल अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नव्या महिला धोरणाबाबत बोलताना सांगितले की मुला-मुलीच्या नावापुढे आता आईचे नाव मग वडिलांचे नाव आणि पुढे आडनाव येईल. त्यावर पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, “काहींनी हे म्हटलंय की आईचे नाव वडिलांच्या पुढे लावा पण काहींच्या हे लक्षात येईना की मुलाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी आईची जात पण लावली पाहिजे. मी आईची जात लावा म्हणतो तर काय दुखते? काहींचे तेव्हा तिथे तोंड उघडत नाही,” असे पाटील यांनी पवारांना सुनावले.
(हेही वाचा-Pune Airport: पुणे-लोहगाव विमानतळाचा अनोखा विक्रम, एका महिन्यात ७ लाखांहून जास्त प्रवाशांनी केला प्रवास)
वाद वाढणार?
कायद्याप्रमाणे मुलगा किंवा मुलगी यांची जात हि वडिलांच्या जातीवर आधारित असून वडिलांचीच जात मुलाला किंवा मुलीला
लागते मात्र पाटील यांनी जातीच्या आरक्षणाचा लाभ मुलांना मिळावा यासाठी आईची जात लावण्याचीहि मागणी लावून धरली आहे. जरांगे यांच्या टीकेवर आता पवार काय प्रतिक्रिया देऊन वाद वाढणार की दुर्लक्ष करून वाद इथेच थांबवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community