PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो; जाणून घ्या काय आहे कारण ?

विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.

184
PM Narendra Modi यांच्या हस्ते ३० ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन

अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. यापुर्वी ३० डिसेंबर रोजी विमानतळाचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.(PM Narendra Modi)

राम मंदिराचे उदघाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा : Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; दिले ‘हे’ कारण)

या मार्गावर ५१ ठिकाणी उभारणार  मंडप
विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकपर्यंत पोहचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीश कुमार यांनी सांगितले. या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. अयोध्येसाठी पहिल विमान दिल्लीहून सकाळी दहा वाजता उड्डाण करून अयोध्येत सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.