Delhi Fake Medicines : दिल्लीत सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे, उपराज्यपालांनी केली CBI चौकशीची शिफारस

163
Delhi Fake Medicines : दिल्लीत सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे, उपराज्यपालांनी केली CBI चौकशीची शिफारस
Delhi Fake Medicines : दिल्लीत सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे, उपराज्यपालांनी केली CBI चौकशीची शिफारस

देशाची राजधानी दिल्लीत आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. (Delhi Fake Medicines) दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दावा केला आहे की, दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे सापडली आहेत. रुग्णालयात चाचणी केलेल्या 10 टक्के नमुने सदोष आढळले आहेत. विनय कुमार सक्सेना  (Vinay Kumar Saxena) यांनी या प्रकरणाची सी. बी. आय. (CBI) चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दक्षता विभागाच्या (Vigilance Division) अहवालाच्या आधारे उपराज्यपालांनी ही मागणी केली आहे.

(हेही वाचा – Barsu Geoglyphs: बारसू येथील कातळशिल्प ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित)

काय म्हणाले उपराज्यपाल

दिल्लीचे उपराज्यपाल (Lieutenant Governor of Delhi) विनय कुमार सक्सेना (Vinay Kumar Saxena) यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात हे ‘चिंताजनक’ असल्याचे म्हटले आहे. ही औषधे लाखो रुग्णांना दिली जात आहेत. औषधांच्या खरेदीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

12 औषधांचे अहवाल अद्याप प्रलंबित

सरकारी प्रयोगशाळांमध्ये (Government laboratories) पाठवलेल्या 43 नमुन्यांपैकी 3 नमुने सदोष आढळले आहेत. 12 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या इतर 43 नमुन्यांपैकी 5 नमुने सदोष आढळले आहेत आणि 38 नमुने प्रमाणित गुणवत्तेचे असल्याचे आढळून आले आहेत. 10 टक्क्यांहून अधिक नमुने सदोष आढळल्यामुळे विभागाने नमुन्यांची व्याप्ती वाढवावी, अशी शिफारस दक्षता विभागाने (Vigilance Division) केली आहे. ही औषधे सरकारच्या केंद्रीय खरेदी संस्थेद्वारे (Central Procurement Organisation) खरेदी केली गेली आणि सरकारी रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये पुरवली गेली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो; जाणून घ्या काय आहे कारण ?)

कोणती औषधे आढळली सदोष ?

सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये अमलोडिपिन (Amlodipine), लेव्हेटीरासिटम (Levetiracetam), पँटोप्राझोल (Pantoprazole), सेफालेक्सिन, डेक्सामेथासोन देखील खाजगी प्रयोगशाळांमध्ये फेल झाले आहेत. याशिवाय चंदीगड येथील सरकारी प्रयोगशाळेत 11 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

या संदर्भात देहलीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) म्हणाले की, मी पदभार स्वीकारल्यानंतर औषधांच्या खरेदीची लेखातपासणी करण्याचे निर्देश दिले होते; मात्र आरोग्य सचिवांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. या प्रकरणी प्रशासकीय आणि इतर संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Delhi Fake Medicines)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.