Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम 

कोव्हिड नंतर भारतीय सिनेसृष्टीने २०२३ मध्ये कात टाकली आहे ऑगस्ट महिन्यात आरआरआर सिनेमा प्रदर्शित झाल्यावर एका दिवशी तब्बल २८ लाख तिकिटं खपली. 

226
Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम 
Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम 
  • ऋजुता लुकतुके

कोव्हिड नंतर भारतीय सिनेसृष्टीने २०२३ मध्ये कात टाकली आहे ऑगस्ट महिन्यात आरआरआर सिनेमा (RRR Cinema) प्रदर्शित झाल्यावर एका दिवशी तब्बल २८ लाख तिकिटं खपली. (Blockbuster Cinema)

कोव्हिड नंतर सिनेउद्योगाला आलेली सगळी मरगळ २०२३ सालाने एका वर्षात पुसून टाकली असं म्हणावं लागेल. कारण, तिकीट विक्रीच्या निकषांवर हे वर्ष ब्लॉकबस्टर ठरलं आहे. भारतीय जनतेचं मनोरंजनाचं सगळ्यात लाडकं साधन सिनेमा हेच आहे, हे पूर्वीच सिद्ध झालंय. पण, यंदा ऑनलाईन तिकीट विक्रीचे काही विक्रम बघायला मिळाले.  (Blockbuster Cinema)

जसं की, १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी तब्बल २८ लाख ऑनलाईन तिकिटं काढली गेली. यात अर्थातच मोठा वाटा राजामौली यांच्या आरआरआर (RRR Cinema) या सिनेमाचा होता. यावर्षी ९० टक्के भारतीयांनी एक तरी सिनेमा पाहिला. आणि १३ ते १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनाच्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक लोक सिनेमागृहात जाऊन सिनेमाचा आनंद लुटत होते. यात १०,९०,००० लोकांनी सिनेमागृहात सिनेमाचा आनंद लुटला.  (Blockbuster Cinema)

(हेही वाचा – PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो; जाणून घ्या काय आहे कारण ?)

सिनेमागृहात सिनेमा पाहणारा सगळ्यात मोठा वर्ग हैद्राबाद शहरात आहे. इथल्या एका व्यक्तीने वर्षभरात ९९ सिनेमे सिनेमागृहात जाऊन पाहिले. वर्षात ६ किंवा त्यापेक्षा जास्त सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या १६,४८,००० इतकी आहे. लोकांची सिनेमा पाहण्याची वारंवारता पाहिली तर प्रत्येक भारतीय दोन महिन्यांना सरासरी एक सिनेमा पाहतो. अर्थात, वर्षभराच्या आकडेवारीवरून ही सरासरी काढण्यात आली आहे.  (Blockbuster Cinema)

देशभरात जवान, पठाण, गदर २, जेलर, ॲनिमल, लिओ, द केरला स्टोरी, आदिपुरुष, पोनियन सेल्वन, टायगर ३, रॉकी और रानीकी प्रेमकहानी, ओ माय गॉड २ हे सिनेमे हिट झाले. मल्टीप्लेक्सच्या बरोबरीने यावेळी सिंगल स्क्रीन सिनेमागृहांनाही चांगला प्रतिसाद होता. ४० टक्के तिकीट विक्री ही इथून झाली आहे.  (Blockbuster Cinema)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.