Ayodhya Pran Pratishtha : मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; जाणून घ्या कारण…

Ayodhya Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य होणार नाही.

318
Ayodhya Pran Pratishtha : मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; जाणून घ्या कारण...
Ayodhya Pran Pratishtha : मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; जाणून घ्या कारण...

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची अयोध्येत जोरदार तयारी चालू आहे. (Ayodhya Pran Pratishtha) 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यपाल आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार नाही. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य होणार नाही. (Ram Mandir Ayodhya)

(हेही वाचा – Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम )

केवळ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल उपस्थित रहाणार

सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील अन्य राज्यांचे मुख्यमंत्री (Chief Minister) आणि राज्यपाल (Governor) यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यजमान राज्य असल्याने केवळ उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राज्यपाल (Governor) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहतील.

1 मिनिट 24 सेकंदांचा आहे मुहूर्त

रामलल्लाचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेष निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त 1 मिनिट 24 सेकंदांत होणार आहे. काशीच्या पंडितांनी हा मुहूर्त ठरवला आहे. द्रविड बंधू पंडित गणेश्वर शास्त्री आणि द्रविड पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29:08 ते 12:30:32 वाजेपर्यंत मुहूर्त होणार आहे. म्हणजेच प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त 1 मिनिट 24 सेकंदांचा असेल. (Ayodhya Pran Pratishtha)

(हेही वाचा – Delhi Fake Medicines : दिल्लीत सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे, उपराज्यपालांनी केली CBI चौकशीची शिफारस)

कोण कोण होणार सहभागी ?

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 7,000 लोकांना आमंत्रणे पाठवली जातील. त्यापैकी 3,000 अतिप्रतिष्ठित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि 3 हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. याशिवाय देशभरातून 4000 साधू आणि संतांना आमंत्रित केले जात आहे. (Ayodhya Pran Pratishtha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.