Israel–Hamas War : हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पोप यांना पत्र; सारा नेतान्याहू यांनी व्यक्त केल्या वेदना

हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी अनेक नवजात बालकांना जाळले. तसेच कित्येक इस्रायली महिलांवर बलात्कार केला आहे, असे सारा नेतान्याहू यांनी पोप यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

191
Israel–Hamas War : हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पोप यांना पत्र; सारा नेतान्याहू यांनी व्यक्त केल्या वेदना
Israel–Hamas War : हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पोप यांना पत्र; सारा नेतान्याहू यांनी व्यक्त केल्या वेदना

इस्रायल-हमास ओलिसांची कुठल्याही अटी-शर्तींशिवाय सुटका व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती सारा नेतान्याहू यांनी पोप यांच्याकडे विनंती केली आहे. (Israel–Hamas War) गेल्या अडीच महिन्यांपासून इस्रायल आणि हमामध्ये युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत २० हजारांहून अधिक बळी गेले आहेत. त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांची पत्नी सारा नेतान्याहू (Sarah Netanyahu) यांनी पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांना इस्रायल-हमास युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी विनंती आहे.

(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; जाणून घ्या कारण…)

दहशतवाद्यांनी नवजात बालकांना जाळले; महिलांवर बलात्कार

सारा नेतान्याहू (Sarah Netanyahu) यांनी पोप यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हमासच्या दहशतवाद्यांनी (Hamas Terrorists) अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी अनेक नवजात बालकांना जाळले. तसेच कित्येक इस्रायली (Israel) महिलांवर बलात्कार केला आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून ज्या इस्रायली नागरिकांचे अपहरण केले होते.

दहशतवाद्यांनी नोआ अरगामेनी (Noa Argamani) नावाच्या महिलेला ओलीस ठेवले आहे. त्या महिलेची व्यथा सारा यांनी पोप यांच्यासमोर मांडली आहे. नोआची आई चौथ्या टप्प्याच्या कॅन्सरशी झुंज देत आहे. या आजारी आईला तिच्या अखेरच्या दिवसांत तिच्या मुलीला भेटायचे आहे.

(हेही वाचा – Solar Eclipse : नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी)

ज्यूंच्या नरसंहारानंतरची सर्वांत वेदनादायी घटना

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याची भीषणता सारा नेतान्याहू (Sarah Netanyahu) यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ”हिटलरच्या काळात जर्मनीत झालेल्या ज्यूंच्या नरसंहारानंतरची ही सर्वांत वेदनादायी घटना आहे. गेल्या ७८ दिवसांपासून हे अत्याचार चालू आहेत. हमासने अजूनही १२९ पुरुष, महिला आणि लहान मुलांना ओलीस ठेवले आहे. त्यापैकी बहुसंख्य लोक हे जखमी आणि आजारी आहेत. तसेच उपासमारीने त्रस्त आहेत. त्याचबरोबर त्यांना औषधेदेखील मिळत नाही.”

सारा यांनी पकत्राद्वारे विनंती केली आहे की, ”तुम्हाला (पोप फ्रान्सिस) वैयक्तिकरित्या या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करते आणि ओलिसांची सुटका करण्यासाठी तुमचा प्रभाव वापरावा.” (Israel–Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.