ST Breakfast Scheme : ३० रुपयांत नाष्ट्याची एसटीची योजना अडगळीत; प्रवाशांची लूट सुरुच

ST Breakfast Scheme : सध्या नाताळ सुट्यांचे दिवस असल्याने एसटीने अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. दुसऱ्या बाजूला एसटी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या योजनांचा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवासी तक्रार करत आहेत.

236
ST Breakfast Scheme : ३० रुपयांत नाष्ट्याची एसटीची योजना अडगळीत; प्रवाशांची लूट सुरुच
ST Breakfast Scheme : ३० रुपयांत नाष्ट्याची एसटीची योजना अडगळीत; प्रवाशांची लूट सुरुच

एसटीने लांबचा प्रवास करतांना चहा-नाष्टा करायला थांबलो की, अनेक अनुभव येतात. (ST Breakfast Scheme) १० रुपयांचा चहा १५ रुपयांना, साधासाच वडापाव ३० रुपयांना दिला जातो. त्या आडबाजूच्या बसथांब्याच्या आजूबाजूला फारशी सोयही नसते. अशा वेळी प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने योजना आणली आहे. एसटीच्या (MSRTC) प्रवाशांसाठी अधिकृत थांब्यांवर ३० रुपयांत नाश्ता मिळण्याची तरतूद केली आहे.

(हेही वाचा – BMC : केवळ १ कि.मी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी तब्बल १६ कोटी रुपये होणार खर्च)

प्रवाशांच्या तक्रारी 

अनेक ठिकाणी शासन आदेशाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. महामंडळाने त्यांची दखल घेत कारवाईचे आदेशही दिले होते. सध्या नाताळ सुट्यांचे दिवस असल्याने एसटीने अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. दुसऱ्या बाजूला एसटी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या या योजनांचा फायदा होताना दिसत नाही. ठरलेल्या दरात नाश्ता (Brea) आणि नाथजल (Nathjal) उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तसेच या प्रकाराला लवकरात लवकर आळा घालावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

३० रुपयांत कोणता नाष्टा ?

एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३० रुपयांना द्यावा लागतो. एसटी महामंडळाचे ‘नाथजल’ या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ ऐवजी २० रुपये आकारण्यात येतात. विक्रेत्याने छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारू नये, असे आदेश महामंडळाने दिले आहेत.

(हेही वाचा – Israel–Hamas War : हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पोप यांना पत्र; सारा नेतान्याहू यांनी व्यक्त केल्या वेदना)

बसस्थानकातील हॉटेलचालक (hotels in ST stand) जास्तीचे दर घेऊन नाश्ता देत असेल, तर त्याची तक्रार एसटी महामंडळाकडे करता येते. त्या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (ST Breakfast Scheme)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.