Thane Kasheli Bridge : ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे यासाठी होणार स्ट्रक्चरल ऑडीट

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा जलवाहिनींसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरुन जात असून भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे.

2899
Thane Kasheli Bridge : ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे यासाठी होणार स्ट्रक्चरल ऑडीट
Thane Kasheli Bridge : ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे यासाठी होणार स्ट्रक्चरल ऑडीट

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा जलवाहिनींसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरुन जात असून भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural audit) करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून व्हीजेटीआय मुंबईची (VJTI Mumbai) नेमणूक करण्यात आली आहे. (Thane Kasheli Bridge)

मुंबईला दरदिवशी सुमारे ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असून या विविध आकाराच्या जलवाहिन्यांमधून हे पाणी मुंबईत आणले जाते. या सर्व जलवाहिन्यांची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती महापालिकेच्या माध्यमातून केली जाते. जलवाहिनी फुटणे तसेच आपत्कालिन इत्यादी कामे करण्यासाठी सुमारे १०० कि.मी लांबीचे सेवा रस्ते असून महानगरपालिकेने मुख्य जलवाहिनीच्या बाजूने बांधले आहेत. तसेच ठाणे खाडी वरील दक्षिण कशेळी पुलाच्या (Kasheli Bridge) दोन्ही बाजुस विविध आकाराच्या जलवाहिनी आहेत. त्यामध्ये २४०० मि.मी. व्यासाची तानसा जलवाहिनी, १८०० मि.मी. व्यासाची वैतरणा जलवाहिनी व १८०० मि.मी. मुख्य जलवाहिनींचा सामावेश आहे. (Thane Kasheli Bridge)

(हेही वाचा – BMC : केवळ १ कि.मी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी तब्बल १६ कोटी रुपये होणार खर्च)

दक्षिण कशेळी पुलावरील (Kasheli Bridge) तीन जलवाहिन्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने त्याकरिता दक्षिण कशेळी पुलाचे बांधकाम व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे खाडीवरील कशेळी पुलाच्या संरचनात्मक परिक्षण सल्लागार व दुरुस्तीच्या कामाकरता तांत्रिक सल्लागार तसेच प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून व्हीजेटीआय मुंबई (VJTI Mumbai) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी ८० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. (Thane Kasheli Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.