शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी डोंबिवलीत केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (२५ डिसेंबर) डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे झाला. (Ravindra Chavan)
यावेळी उपस्थित लाभार्थी व नागरिकांना चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सांगितले की, शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हव्या. या योजना केवळ कागदावर नसाव्यात. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकेल. यावेळी भाजपाचे शशिकांत कांबळे, माजी पालिका सदस्य, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, सहायक आयुक्त स्नेहा करपे, चंद्रकांत जगताप इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते. (Ravindra Chavan)
(हेही वाचा – Bank Fraud : जळगाव जनता बँकेत २६ लाखांचा अपहार)
यावेळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सला भेटी देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात एकूण ३३५ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला. (Ravindra Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community