Natya Sammelan 2023 : तमिळनाडूमध्ये होणार पिंपरी-चिंचवडच्या १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात

Natya Sammelan 2023 नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली आहेत. ती तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महालात सुरक्षित आहेत. त्या स्मृतींना वंदन करण्यात येणार आहे.

461
Natya Sammelan 2023 : तमिळनाडूमध्ये होणार पिंपरी-चिंचवडच्या १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात
Natya Sammelan 2023 : तमिळनाडूमध्ये होणार पिंपरी-चिंचवडच्या १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची (Natya Sammelan 2023) सध्या जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पिंपरी चिंचवडला (Pimpri Chinchwad) होणाऱ्या या नाट्य संमेलनाची सुरुवात मात्र आगळी-वेगळी होणार आहे. तामिळनाडूतील तंजावर (Thanjavur) येथे २७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता नाटककार शाहराज राजे भोसले (Shahraj Raje Bhosale) यांच्या नाट्यवाङमयाला वंदन करून, तसेच नटराजपूजनाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला जाणार आहे.

(हेही वाचा – Corona JN1 Virus : मुंबईत आतापर्यंत जेएन १चा एकही रुग्ण नाही)

नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या स्मृतींना वंदन

नाटककार शाहराज राजे भोसले (Shahraj Raje Bhosale) यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली आहेत. ती तमिळनाडूतील (Tamil Nadu) तंजावर येथील सरस्वती महालात (Saraswathi Mahal Library) सुरक्षित आहेत. १६९०मध्ये रंगभूमीवर आलेले ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ (Lakshmi Narayan Kalyan) हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात ‘लक्ष्मी नारायण’ यांच्या लग्नाची कथा होती. हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार

या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या निमित्ताने नांदी, श्री गणेश वंदना, नटराज नृत्य आणि शाहराज राजे भोसले लिखीत ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ या नाटकातील प्रवेश सादर करण्यात येणार आहे. नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत. याव्यतिरिक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.

(हेही वाचा – Ravindra Chavan : शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन)

५ ते ७ जानेवारी २०२४ या काळात होणार संमेलन

पिंपरी-चिंचवड येथे ५ ते ७ जानेवारी २०२४ या काळात १०० व्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत. २९ डिसेंबर रोजी सांगली येथे ‘संगीत सीता स्वयंवर’कार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. (Natya Sammelan 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.