उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन (Mahalakshmi Saras Exhibition) व विक्री २६ डिसेंबरपासून वांद्रे (Bandra) येथील एमएमआरडीए मैदानावर (MMRDA Ground) सुरू होत आहे. २६ डिसेंबर ते ८ जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे (Mahalakshmi Saras Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांना (Mahila Bachat Gat) सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. (Mahalakshmi Saras Exhibition)
दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन (Mahalakshmi Saras Exhibition) महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे ८ हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी (Mahila Bachat Gat) तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो. (Mahalakshmi Saras Exhibition)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : मंदिरही बनवले आणि ३७० ही हटवले; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा)
प्रदर्शनात ‘या’ स्टॉल्सचा असणार समावेश
या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. (Mahalakshmi Saras Exhibition)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community