Chunabhatti Firing : वर्चस्वाच्या लढाईतुन सुमित येरुणकरची हत्या

४ देशी बनावटी पिस्तूलमधून १५ ते १६ राउंड फायर, चार हल्लेखोरांना अटक

651
Chunabhatti Firing Case : गुंड सुमितची हत्या सूडबुद्धीने; विकासक विमल जैनला अटक
Chunabhatti Firing Case : गुंड सुमितची हत्या सूडबुद्धीने; विकासक विमल जैनला अटक

सायन-चुनाभट्टी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांनी ८ तासात चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असून एका हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा हल्ला वर्चस्व तसेच स्थानिक बांधकाम विकासकाकडून कामे मिळविण्याच्या वादातून झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रविवारी दुपारी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात स्थानिक गुंड सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याचा मृत्यू झाला असून त्याचे तीन सहकारी आई एक ८ वर्षाची मुलगी जखमी झाली होती. हल्लेखोरांनी वापरलेल्या चार देशी बनावटीच्या पिस्तूल मधून अंदाजे १५ ते १६ राऊंड फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याला लागल्या व तो जागीच ठार झाला होता. (Chunabhatti Firing)

सनील उर्फ सन्नी पाटील (३६), सागर संजय सावंत (३६) नरेश उर्फ नऱ्या गजानन पाटील (४२) आणि आशुतोष उर्फ बाबू देविदास गावण (२५) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. पाचवा संशयित आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांना नवी मुंबईच्या (Navi Mumbai) सानपाडा (Sanpada) येथून अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटक हल्लेखोर सर्व सायन चुनाभट्टी (Sion-Chunabhatti) येथील आझाद गल्ली आणि पाटील गल्ली या ठिकाणी राहण्यास असून अटक करण्यात आलेले चौघांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या हल्लेखोरांपैकी सन्नी पाटील हा मुख्य आरोपी असून त्याच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, अटक हल्लेखोर हे सर्व गिरणी कामगारांची मुले आहेत. (Chunabhatti Firing)

(हेही वाचा – Corona JN-1 Virus : कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, माहितीसाठी ‘या’ हेल्पलाइनवर संपर्क करा)

२०१६ पूर्वी हल्ल्यात ठार झालेला सुमित उर्फ पप्पु येरुणकर याच्यासाठी सन्नी पाटील हा काम करीत होता, फेब्रुवारी २०१६ मध्ये सुमित याने चुनाभट्टी (Chunabhatti) येथील बांधकाम व्यवसायिक जिग्नेश जैन यांच्या कार्यालयावर केलेल्या गोळीबार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर विशेष मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सुमित आणि त्याच्या साथीदारांची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये सुमित तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुमितने परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता, सन्नी पाटील हा स्थानिक बांधकाम व्यवसायिकाही बांधकाम साईड सांभाळणे, मजूर पुरवणे या सारखी कामे करीत होता. सुमितने ही कामे स्वतःला मिळावी म्हणून बांधकाम व्यवसायिक आणि सुनील उर्फ सन्नी पाटील याच्यावर दबाव आणला होता. सन्नी पाटील आणि सुमित यांच्यात महिन्याभरापूर्वी शाब्दिक वाद झाला होता, या वाढत सुमितने सन्नीला धमकी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. सुमित हा वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असून नवी मुंबई (Navi Mumbai) येथून मुले आणून येथे दादागिरी करीत असल्याचं रागातून सन्नी याने सुमितला संपविण्याचा कट रचला होता. सन्नी पाटील याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सुमितला संपविण्याची योजना आखली होती. (Chunabhatti Firing)

(हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणात SIT मधून चिमाजी आढाव पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची नितेश राणेंची मागणी )

२ जानेवारी रोजी सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याचा वाढदिवस होता, त्यासाठी सुमितने स्वतःचे बॅनर परिसरात लावण्यासाठी स्वतःचे फोटो काढण्यासाठी रविवारी दुपारी आझाद गल्ली च्या तोंडावर असलेल्या श्री फोटो स्टूडियो येथे गेला होता, त्याच्यासोबत त्याचे इतर चार सहकारी होते. सुमित हा फोटो स्टुडियोत आल्याची खबर सन्नी पाटीलला लागताच त्याने चारही साथीदारासोबत आझाद गल्ली येथे येऊन चौघांनी बेछूट गोळीबार सुरु केला, या गोळीबारात सुमित बाहेर उभे असणारे त्याचे तीन साथीदार रोशन लोखंडे, मदन पाटील व आकाश खंडागळे तसेच परिसरात राहणारी ८ वर्षांची त्रिशा शर्मा हे चौघे जखमी झाले होते. त्यांना सायन रुग्णालयात (Sion Hospital) हलविण्यात आले असता सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याला डॉक्टरांनी मृत घोषित करून इतर चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे तसेच परिमंडळ ६ मधील इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे ९ पथके पोलिसांनी हल्लेखोरांच्या मागावर पाठवली होती. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी फोटो स्टुडियोमध्ये एका देशी बनावटीचे पिस्तूल आणि तसेच २५ काडतुसे त्यापैकी १५ रिकाम्या पुंगळ्या आणि १० जिवंत काडतुसे घटनास्थळी मिळून आली. हल्लेखोरांनी वापरलेले पिस्तूल अद्याप जप्त करण्यात आलेली नसून फोटो स्टुडियोमध्ये मिळून आलेले पिस्तूल हे सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Chunabhatti Firing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.