२५ डिसेंबर हा ख्रिसमस (Christmas) म्हणून जगभर साजरा केला जातो, त्यानुसार यंदाच्या वर्षीही ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे, पण ज्याच्या जन्माचा हा सण साजरा ख्रिस्ती पंथीय साजरा करतात त्या येशू ख्रिस्ताचे जन्मस्थळी स्मशानशांतता दिसत आहे. कारण हे जन्मस्थळ बेथलेहेम शहर आहे. जे सध्या युद्धाच्या तावडीत सापडले आहे. पॅलेस्टिनी येथे हे शहर आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात हे युद्ध सुरु आहे.
ख्रिसमसला जेथे लोक आनंदाचे नाचायचे, तिथे रणगाड्यांचा आवाज ऐकू येतोय
बेथलेहेम हे शहर पॅलेस्टिनीमध्ये आहे. सध्याच्या परिस्थितीत हे शहर हमास आणि इस्राइल युद्धामुळे हे शहर ओसाड पडले आहे. सततचा गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यामुळे या शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. या शहरात ज्या रस्त्यांवर ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी लोक आनंदाचे नाचायचे, त्याच ठिकाणी आता लष्कराच्या रणगाड्यांचा आवाज ऐकू येत आहे. बेथलेहेम शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातून लोक याठिकाणी चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी येतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लोकांना गुन्हेगारांप्रमाणे लपून रहावे लागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 20 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
(हेही वाचा Devendra Fadnavis : मंदिरही बनवले आणि ३७० ही हटवले; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा)
Join Our WhatsApp Community