Charles Babbage : फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बॅबेज

848
Charles Babbage : फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बॅबेज
Charles Babbage : फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बॅबेज

चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) यांना संगणकाचे जनक मानले जाते. कारण त्यांना संगणकाची कल्पना सुचली होती. ते इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होते. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ मध्ये लंडन येथे झाला.

बॅबेज (Charles Babbage) यांच्याकडे पहिला मेकॅनिकल कॉम्प्युटर, डिफरन्स इंजिन शोधण्याचे श्रेय जाते. १८२० च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी “डिफरन्स इंजिन” ची कल्पना मांडली. मात्र त्यांच्या या प्रकल्पामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांचे स्वप्न साकार करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मात्र त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

(हेही वाचा-Japan : तब्बल 78 वर्षांनंतर जपानची शस्त्रास्त्रे निर्यातीला मंजुरी)

तरी ते खचून गेले नाहीत. त्यांनी आपल्या कल्पनांचा विस्तार करत “विश्लेषणात्मक इंजिन” ची संकल्पना मांडली. या मशीनमध्य मेमरी आणि प्रोसेसर यांचा नाविन्यपूर्ण समावेश होता. विश्लेषणात्मक इंजिनमुळे आधुनिक संगणक निर्माण होण्यास हातभार लागला. ते रॉयल सोसायटी ऑफ लंडन आणि फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते.

विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मेंदू जतन करण्यात आला आणि तो लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये ठेवण्यात आला. त्यांच्या नावाने बॅबेज पुरस्कार हा यूकेमधील सर्वात उत्कृष्ट संगणक विज्ञान विद्यार्थ्याला दिला जातो.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.