नांदेडजवळ (Nanded) पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला मंगळवारी भीषण आग लागली. ही आग कशी लागली याबाबत चौकशी सुरू आहे. नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये ही गाडी उभी होती. त्यावेळी रिकाम्या लगेजच्या व्हॅन कोचला आग लागली. या घटनेनंतर ३० मिनिटांत आग आटोक्यात आली. यावेळी इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना अयोध्यामध्ये निमंत्रण न देण्यामागील कारण गिरीश महाजनांनी सांगितले; म्हणाले… )
आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला कळवण्यात आली. अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Join Our WhatsApp Community#WATCH | Fire broke out in an empty luggage-cum-guar van coach stationed in the Nanded maintenance Yard today. The fire was completely brought under control within 30 minutes of the incident and there was no damage to any other coaches: CPRO South Central Railways #Maharashtra pic.twitter.com/m7xRK3eqpZ
— ANI (@ANI) December 26, 2023