अयोध्यामधील श्रीराम मंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) श्रीरामाच्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता या सोहळ्याच्या निमंत्रणावरून रुसवे फुगवे सुरु झाले आहेत. या सोहळ्यासाठी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून उबाठाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी यामागील कारण सांगितले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीत शिवसेनेचे मोठे योगदान आहे. या लोकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिले नसते. कारण हा भाजपचा या मंदिराचे श्रेय घेण्याचा भाग आहे. जेव्हा श्रीराम मंदिराचा प्रश्न थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे त्याठिकाणी गेले होते त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला. आता उद्धव ठाकरे यांना तिथे बोलावले तर शिवसेनेचा जयजयकार होईल, म्हणून उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा Ayodhya Ram mandir : अयोध्येच्या सध्याच्या मंदिरात दर्शन – पूजा २० जानेवारीपासून बंद ; जय्यत तयारी सुरू)
काय म्हणाले गिरीश महाजन?
श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीत उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे? उद्धव ठाकरेंनी १ कोटी रुपयांची देणगी दिली, तरीही त्यांना सोहळ्याला निमंत्रण का नाही, असा सवाल पत्रकाराने विचारला होता. त्यावर, कोटी-कोटी रुपये खूप लोकांनी दिले आहेत. केवळ कोटी रुपये दिले म्हणून त्यांना बोलवता येत नाही. आपण स्वतः दोनवेळा कारसेवा केली आहे. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा आपण स्वतः तिथे उपस्थित होतो. २० दिवस तुरुंगात होतो, त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? ते घरातच बसलेले होते. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यांना का बोलवायचे? ते कधी तरी विधानविधानसभेत पाय ठेवणे नाही. मग त्यांना अयोध्येला बोलावले काय किंवा नाही बोलावले काय, त्या सोहळ्यांना खूप मोठे व्हीव्हीआयपी लोक येणार आहेत. मला वाटते शासनाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसावेत, असे गिरीश महाजन म्हणाले.
Join Our WhatsApp Community