RBI च्या मुख्यालयासह HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या ईमेलने खळबळ 

220

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला मंगळवारी, २६ डिसेंबर रोजी धमकीचा ईमेल आला. त्यामध्ये RBI च्या मुख्य कार्यालयासह HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या ईमेलमुळे एकाच खळबळ उडाली, सुरक्षा पातळीवर एकच हल्लकल्लोळ माजला.

खिलाफत इंडिया नावाच्या संघटनेने आरबीआयच्या कार्यालयाला धमकीचा ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये आरबीआय (RBI) कार्यालय, एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेसह देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील विविध 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. या ईमेलमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.

(हेही वाचा MIDC : मालकी हक्क नसलेल्या ३४ हेक्टर भूखंडासाठी ‘एमआयडीसी’ने दिले ५ कोटी; ‘कॅग’च्या अहवालात धक्कादायक उघड)

या ईमेलमध्ये मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मुंबईत विविध ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वच ठिकाणी जाऊन तपासणी केली. त्यात त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे धमकीचा ईमेल बोगस असल्याचे निष्पन्न झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईच्या कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर [email protected] या ईमेल आयडी वरून धमकीचा मेल प्राप्त झाला होता. इंग्रजी भाषेत आलेल्या या ईमेल मध्ये ‘आरबीआय ने खाजगी क्षेत्रातील बँकासह भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला असल्याचे म्हटले आहे, तसेच या घोटाळ्यात आरबीआय गव्हर्नर आणि वित्त मंत्री प्रमुख बँकिंग अधिकारी आणि भारतातील मंत्र्यांचा उल्लेख करून या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. आरबीआय फोर्ट मुंबई, एचडीएफसी हाऊस चर्चगेट आणि बीकेसी येथील आयसीआयसीआय बँक टॉवर्ससह ११ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले आहे. आरबीआय गव्हर्नर आणि वित्तमंत्री यांनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांनी प्रेस स्टेटमेंट जारी करावी अशी मागणी ईमेलमध्ये करण्यात आली आहे. आमची मागणी दुपारी दीड वाजेपर्यंत मान्य न झाल्यास एकाच वेळी तिन्ही बँकासह ११ ठिकाणी बॉम्बस्फोट केले जातील, अशी धमकी ईमेल कर्त्याने दिली आहे. आरबीआय बँकेच्या सुरक्षा अधिकारी यांनी तात्काळ ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून देत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसानी तात्काळ तिन्ही ठिकाणी बॉम्ब स्कॉड, श्वान पथके पाठवून बँकांची तपासणी करण्यात आली परंतु तपासणीमध्ये पोलिसांना  काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.