Belapur Family Court : वाढत्या नागरिकरणामुळे कौटुंबिक वादांचे प्रमाण जास्त – न्यायमूर्ती भारती डांगरे

Belapur Family Court : आज कुटूंबात केवळ पती-पत्नी असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाल्यास कोणी समजाविण्यासाठी राहिलेले नाही. अशातच पती-पत्नी हे दोघेही माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सर्व क्षेत्रातील माहिती झाली व त्यामुळे प्रत्येकजण वेगवान बनण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी खंत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी व्यक्त केली.

218
Belapur Family Court : वाढत्या नागरिकरणामुळे कौटुंबिक वादांचे प्रमाण जास्त - न्यायमूर्ती भारती डांगरे
Belapur Family Court : वाढत्या नागरिकरणामुळे कौटुंबिक वादांचे प्रमाण जास्त - न्यायमूर्ती भारती डांगरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बेलापूर, नवी मुंबई येथील कौटुंबिक न्यायालय कार्यान्वित झाले. (Belapur Family Court) त्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

(हेही वाचा – Rajanath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवरील हल्लेखोरांना पाताळातून शोधून काढू)

कौटुंबिक वादांचे प्रमाण जास्त

याप्रसंगी न्यायमूर्ती भारती डांगरे (Justice Bharti Dangre) आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कौटुंबिक न्यायालयात एक न्यायाधीश आणि इतर कर्मचारी वर्ग घेण्यात आले आहेत. लवकरच या न्यायालयात पूर्ण कर्मचारी वर्ग देऊन न्यायालयाचे काम सुरळीतपणे गतिमान करण्यात येईल. दिवसेंदिवस मालमत्तेचे वाद वाढत आहेत, तसेच कौटुंबिक वादही जास्त प्रमाणात दाखल होत असून हे वाद विवाहसंस्था अशा जुन्या संस्थेशी निगडित आहेत. तसेच वाढत्या नागरिकरणामुळे आज कौटुंबिक वाद हे जास्त प्रमाणात न्यायालयात दाखल होत आहेत.

सर्वांत जास्त प्रकरणे मुंबई, पुणे, नाशिकमध्ये

आपल्या देशात कुटूंब ही संज्ञा जुनी व महत्त्वाची संज्ञा आहे. परंतु वाढत्या नागरीकरणाचा परिमाण सामाजिक व व्यक्तिगत जीवनावर होवून कौटुंबिक वाद (Family disputes) निर्माण होत आहेत. आज सर्वांत जास्त कौटुंबिक प्रकरणे मुंबई, पुणे, नाशिक व नवी मुंबई मध्ये दाखल होत आहेत.

(हेही वाचा – Rajanath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवरील हल्लेखोरांना पाताळातून शोधून काढू)

कुटूंब अबाधित राहण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाचे योगदान

त्या (Justice Bharti Dangre) पुढे म्हणाल्या, ”कुटुंब ही जुनी संस्था असून त्यामध्ये पूर्वी पती-पत्नी व मुले, तसेच बऱ्याच वेळी दत्तक मुले देखील असत. कारण माणूस हा एकटा राहू शकत नाही व त्यांना कुटुंबाची पूर्ण गरज असते. आपल्या कौटुंबिक न्यायालयाने कुटूंब अबाधित राहण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत. पूर्वी अस्तित्वात असलेली एकत्रित कुटूंबपध्दती ही आज वाढत्या शहरीकरणामुळे (urbanization) व नागरीकरणामुळे नष्ट होत चालली असून एकल कुटूंब पध्दत अस्तित्वात येत चालली आहे. त्यामुळे आज कुटूंबात केवळ पती-पत्नी असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाल्यास कोणी समजाविण्यासाठी राहिलेले नाही. अशातच पती-पत्नी हे दोघेही माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सर्व क्षेत्रातील माहिती झाली व त्यामुळे प्रत्येकजण वेगवान बनण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु पती व पत्नी यांच्यातील वादामुळे मुलांना केवळ आई किंवा वडिलांचे प्रेम मिळते.”

कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिशांची जबाबदारी मोठी

मुलांच्या मानसिक वाढीकरता दोघांच्या प्रेमाची आवश्यकता असते. त्यामुळे ही बाब न्यायालयात घेवून येणाऱ्या पक्षकारांकरिता कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिशांची याबाबत खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधिशांना काही वेळा नियमानुसार, तर काही वेळा भावनिकता लक्षात घेवून या प्रकरणांचा निपटारा करणे आवश्यक आहे. आमच्या कौटुंबिक न्यायालयातील सर्व न्यायाधीश हे कार्य अतिशय योग्यरित्या पार पाडीत आहेत, असे गौरवोद्गार काढून शेवटी त्यांनी नवी मुंबई, बेलापूर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश डॉ. रचना तेहरा व बेलापूर विधीज्ञ बार कौन्सिल (Belapur Lawyers Bar Council) यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Belapur Family Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.