Rajanath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवरील हल्लेखोरांना पाताळातून शोधून काढू

242

‘एमव्ही केम प्लुटो’ जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील ‘एमव्ही साईबाबा’वरील हल्ल्याप्रकरणी आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajanath Singh) यांनी थेट कडक शब्दांत इशारा दिला आहे. हल्लेखोरांना पाताळातून शोधून काढू असे ते यासंदर्भात बोलताना म्हणाले.

(हेही वाचा RBI च्या मुख्यालयासह HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या ईमेलने खळबळ )

भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक शक्ती अनेकांना त्रासदायक वाटू लागली आहे. ज्यांनी हा हल्ला केला असेल त्याला समुद्राच्या तळापासूनही बाहेर काढू आणि धडा शिकवू. त्याला उत्तर देऊ. केंद्रीय मंत्री  राजनाथ सिंह (Rajanath Singh) मुंबईमध्ये ‘आयएनएस इम्फाळ’च्या कमिशनिंग समारंभात बोलत होते. नौदलाच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर, भारताने समुद्रातील गस्त वाढवली आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) सागरी व्यापार नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत प्रयत्न करेल. तसेच, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले, कमर्शिअल शिप्सवर समुद्री दरोडे आणि ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी चार विध्वंसक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. यावर पी-8आय विमान, डोर्नियर्स, सी गार्डियन, हेलीकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या जहाजांचा समावेश आहे.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.