युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी यासाठी केंद्र सरकारच्या (Central Govt) युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने २७ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४’ (National Youth Festival 2024) च्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केली असून ही बाब गौरवास्पद असल्याचे शालेय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यक्रमासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (National Youth Festival 2024)
संस्कृती व परंपरा जतन
युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागणे यासाठी केंद्र सरकारच्या (Central Govt) युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’चे (National Youth Festival 2024) आयोजन १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे करण्यात येणार आहे. (National Youth Festival 2024)
देशभरातून ८,००० व्यक्ती सहभागी होणार
या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये (National Youth Festival) अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधून युवा चमू, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी असे सुमारे ८,००० व्यक्ती सहभागी होणार आहेत. (National Youth Festival 2024)
(हेही वाचा – Health Center : राज्यात २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांची आरोग्य तपासणी)
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा (National Youth Festival) कार्यक्रम योग्यरित्या पार पाडण्यासाठी राज्य स्तरावर दोन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यातील एक १४ सदस्य असलेली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) उपाध्यक्ष तर काही मंत्री आणि प्रमुख विभागांचे सचिव या समितीत सदस्य आहेत. (National Youth Festival 2024)
कार्यकारी समिती
दुसरी समिती ‘राज्यस्तरीय कार्यकारी समिती’ असून ही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. त्यात अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक, ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) चे राज्यप्रमुख असणार आहेत. (National Youth Festival 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community