Prakash Ambedkar :  प्रकाश आंबेडकरांची लोकसभेच्या १२ जागांची मागणी; आघाडीत बिघाडीची शक्यता… 

220
  • सुजित महामुलकर 

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) महायुतीत समान जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करून खळबळ उडवून दिली असतानाच महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याआधीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही लोकसभेत समान जागा वाटपाचा प्रस्ताव मांडून आघाडीत बिघाडी होणार असल्याचे स्वतःच संकेत दिले.

समसमान जागा वाटप करा

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रेखा ठाकूर यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी), शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडी अशा चारही पक्षांनी समसमान म्हणजेच 12-12 जागा लढवाव्यात आणि नरेंद्र मोदी (Modi) सरकारला सत्तेपासून दूर करावे, असा आमचा प्रस्ताव आहे.”

(हेही वाचा RBI च्या मुख्यालयासह HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या ईमेलने खळबळ )

‘त्यांचे’ खासदारही गेले

या अवास्तव मागणीबाबत पत्रकारांनी विचारले असता ठाकूर म्हणाल्या की, “गेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या वेळी (2019) परिस्थिती वेगळी होती. गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीची ताकद खूप वाढली तर अन्य पक्ष कमकुवत (weaken) झाले आहेत. त्यांच्याकडे असलेले खासदारही अन्य पक्षात गेल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. याउलट वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून बूथपासून संघटनात्मक यंत्रणा मजबूत झाली.”

 ‘वंचित’ ची वोटबँक

“वंचित आघाडीची वेगळी वोटबँक तयार झाली आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हे वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत. आपली ताकद वंचितने वेळोवेळी सिद्ध केली आहे,” असा दावा ठाकूर यांनी केला. त्यामुळे असे भांडत बसण्यापेक्षा एकत्र येऊन लढावे असे आमचे मत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.