Differently Abled : राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारची चाचपणी; समिती स्थापन

दिव्यांगांसाठीचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करता येईल का याबाबत अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती सर्व संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करून राज्य सरकारला येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

256
Differently Abled : राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारची चाचपणी; समिती स्थापन
Differently Abled : राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारची चाचपणी; समिती स्थापन

राज्यातील दिव्यांग (Differently Abled) विदयार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य सरकार (State Govt) दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करता येऊ शकते का या पर्यायाची चाचपणी करत आहे. दिव्यांगांसाठीचे (Differently Abled) स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करता येईल का याबाबत अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती सर्व संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करून राज्य सरकारला (State Govt) येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. (Differently Abled)

दिव्यांग विद्यार्थ्यांना (Disabled students) उच्च शिक्षण घेण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ (Independent Disability University) स्थापन करण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींकडून करण्यात येत होती. त्याला अनुसरून राज्य सरकारने (State Govt) एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून कोल्हापूरच्या साहस डिसॲबिलिटी रिसर्च ॲण्ड केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा नसीमताई हुरूजक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख आदींचा या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. (Differently Abled)

(हेही वाचा – Delhi Fog : राजधानीत दिवसा धुक्याचे साम्राज्य)

या गोष्टींचा समितीला करावा लागणार विचार 

दिव्यांग विद्यार्थी (Disabled students) राज्याच्या विविध विद्यापीठांत विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करत आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे शिक्षण होत आहे. राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॲबिलिटीज कायद्यातील सर्व समावेशित शिक्षण ही संकल्पना लक्षात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled students) स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास त्यांना सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेता येणार नाही. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये (Disabled students) वेगळेपणाची भावनाही वाढीस लागू शकते. याचाही अभ्यास या समितीला अहवाल तयार करताना करावा लागणार आहे. दिव्यांग विद्यापीठ (Disability University) स्थापन करायचे झाल्यास ते नेमके कुठे करावे इथपासून त्यासाठीची जागा, सोयीसुविधा आदींचाही या समितीला विचार करावा लागणार आहे. (Differently Abled)

विद्यापीठात शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधीही कशा उपलब्ध होतील याचाही ही समिती विचार करेल. स्वतंत्र विद्यापीठच स्थापन करायचे की पारंपारिक विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled students) स्वतंत्र विभाग केंद्र स्थापन केल्यानेही गुणात्मक फरक पडू शकतो का या पर्यायाचाही ही समिती चाचपणी करेल. येत्या दोन महिन्यात ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. (Differently Abled)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.